बीडमध्ये गुंडाराज! शेतीचा वाद उफाळला, माजी सरपंचानं तरूणावर केला कोयत्याने हल्ला| Beed News

Ex-Sarpanch Injures Man with Deadly Weapon: बीडच्या साक्षाळ पिंपरीत माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने हल्ला केला. तरुण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Beed Crime News Ex-Sarpanch Injures Man with Koyta
Beed Crime News Ex-Sarpanch Injures Man with KoytaSaam Tv News
Published On

बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका माजी सरपंचाने तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले असून, शेत रस्त्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी माजी सरपंचावर कारवाई करत न्यायालयात हजर केलं आहे.

गोरख काशीद असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते साक्षाळ पिंपरी गावाचा माजी सरपंच आहे. तर, प्रकाश काशीद असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेत रस्त्याच्या वादातून प्रकाश आणि गोरख यांच्यात वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी वाद विकोपाला गेला. यानंतर गोरख यांना राग अनावर झाला. त्यांनी प्रकाश याच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केला .

Beed Crime News Ex-Sarpanch Injures Man with Koyta
स्मशानभूमीत कारमध्ये भाजप नेत्याची रासलीला; विवाहित महिलेसोबत संबंध ठेवताना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं | Shocking

रक्तबंबाळ झाल्यानंतर प्रकाश खाली कोसळला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर माजी सरपंचाविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरूवात केली. त्यांनी माजी सरपंच गोरख काशीद याला अटक केली.

Beed Crime News Ex-Sarpanch Injures Man with Koyta
Ladki Bahin Yojana: 'या' लाडकींच्या खात्यात जमा होणार ३,०००; जून आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा होणार? नक्की खरं काय?

पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अशा प्रकारच्या घटनेमुळही कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com