Beed Fraud News: फायनान्स कंपनीला गंडा! बनावट सोने देऊन घेतले २१ लाखांचे कर्ज, ७ जणांवर गुन्हा दाखल

Beed Fraud: बनावट सोने देऊन ७ जणांनी २१ लाखांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed News Fraud Case
Beed News Fraud CaseSaam tv
Published On

Beed Fraud News:

खासगी फायनान्स कंपनीला बनावट सोने देऊन ७ जणांनी २१ लाखांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार किसन कानडे याला अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड नावाच्या खासगी फायनान्स कंपनीचे बीडमध्ये (Beed) सुभाष रोडवर कार्यालय आहे. या कंपनीकडून सोने तारण कर्जही दिले जाते. किसन उमाजी कानडे याने सोन्याच्या १२ बांगड्या व २० अंगठ्या तारण ठेवून ६ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

हे कर्ज घेताना तारण ठेवलेल्या सोन्याची प्राथमिक तपासणी केली होती. १६ डिसेंबर रोजी किसन कानडे हा पुन्हा कर्ज मागणीसाठी आला. यावेळी त्याने आणलेले दागिने हे पूर्वीच्या दागिन्यांसारखे असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. ज्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News Fraud Case
Wada Bhivandi Highway Blocked : काम होऊनही रस्ता जैसे थे; संतप्त नागरिकांचा वाडा भिवंडी राज्य महामार्गावर रास्ता रोको

दरम्यान या प्रकरणी सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या किसन उमाजी कानडे, संतोष किसन कानडे, विलास भीमराव थोरात, पुष्पाबाई महादेव धुताडमल, शहादेव महादेव कानडे, दत्ता भीमराव थोरात या सर्वांविरोधात तसेच त्यांना बनावट दागिने तयार करून देणारा बिपीन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Beed News Fraud Case
Shivsena MLA Disqualification: आमदार अपात्रता सुनावणीत नवा ट्वीस्ट! '...तर शिवसेनेचे सर्वच आमदार अपात्र होणार'; ठाकरे गटाकडून मोठा युक्तीवाद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com