Priya Singh Case: प्रिया सिंह 'हिट अँड रन' प्रकरण, IAS च्या मुलासह तिघांना अटक

Priya Singh News: एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. प्रिया सिंह हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोप असलेल्या अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अश्वजित हा आयएएस अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे.
Priya Singh Case
Priya Singh CaseSaam Tv
Published On

Priya Singh Case:

एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. प्रिया सिंह हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोप असलेल्या अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अश्वजित हा आयएएस अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. पीडित तरूणीने सोशल मीडियावर न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय प्रिया सिंह ही एक इस्टाग्रॉम इंफ्लुएंसर आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ परिसरात ती राहते. नवी मुंबईत प्रिया सलूनचा व्यवसाय करते. अश्वजितसोबत गेल्या साडेचार वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध आहेत. ११ डिसेंबरला पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास अश्वजितनं तिला एका हॉटेलजवळ भेटायला बोलावलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Priya Singh Case
India Alliance News: 'आप पंजाबच्या सर्व 13 लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार', INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी केजरीवालांचे मोठे वक्तव्य

तिथे गेल्यावर तो प्रियाशी बोललाच नाही. त्यांच्यात वादाची ठिणगी पेटल्यामुळे अश्वजित भयंकर संतापला आणि रागाच्या भरात त्यानं तिला शिवीगाळ केली. त्यानंतर जबर मारहाणी केली. मारहाण केल्यानंतर तिच्या डाव्या हाताला चावा घेतला. एवढं सगळं करूनही तो शांत बसला नाही. अश्वजितने प्रियाच्या अंगावर कार घातली. यात तिच्या शरीरावर गंभीर दुखापत झाली आणि तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचे हाड देखील मोडले. (Latest Marathi News)

प्रियानं सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्वजितवर अनेक आरोप केले. अश्वजितसोबत अजून कोण होते. त्याच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची नावं तिनं सांगितली आहेत. प्रियाने आपल्या पोस्टमध्ये अश्वजितसह त्याचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील, आणि सागर शेळके आणि चालक शिवा यांची नावे घेतली आहेत. तसंच प्रियाने न्यायाची मागणी केली होती.

Priya Singh Case
Accident: चंदनापुरी गावाजवळ भीषण अपघात; मालवाहतूक ट्रक कारवर पलटी, चौघांचा मृत्यू

या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर आज त्याला अटकही करण्यात आली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, प्रिया आणि अश्वजित यांच्यात वाद झाल्यानंतर प्रियाने त्याच्या कारच्या दरवाज्याच्या हॅन्डलला पकडलं आणि कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कारचे फूटरेस्ट लागून ती खाली पडली आणि जखमी झाली. चालक सागर शेडगेच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com