police
policeSaam tv

Beed News: वाल्मीक कराडच्या टोळीनंतर आणखी एका टोळीवर मकोका, ३ महिलांचा समावेश

Beed police crackdown on gangs: वाल्मीक कराडच्या टोळीनंतर आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचा समावेश.
Published on

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारी वाढली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक घटना घडल्या, ज्यामुळे राज्य हादरलं. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडच्या टोळीवर मकोका लावण्यात आला. आता आणखी एका सहा जणांच्या टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचा समावेश आहे.

गुन्हेगारी टोळीतील आरोपींमध्ये दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे , मुद्दसर मन्सुर पठाण , सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले यांचा समावेश आहे. या गुन्हेगारी टोळीनं आतापर्यंत बीडसह अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत विविध गंभीर गुन्हे केले आहेत.

police
Disha Salian: 'दिशा सालियानची हत्याच', शिंदे सेनेच्या नेत्याचा मोठा दावा; .. 'याच्यावर कसा विश्वास ठेवावा'? ठाकरे गटाच्या खासदाराकडून प्रत्युत्तर

या टोळीने १६ जानेवारीला वाहिरा ते पिंपळगाव रोडवर आरोपींनी दोघांची हत्या केली होती. आजिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले असे मृत व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, ३ जण फरार आहेत.

police
Shocking: बाप की सैतान? आधी ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, मग गळा दाबून हत्या; खोटी कहाणी रचली, पण पोलिसांनी..

या टोळीवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावे नष्ट करणे, रस्ता अडविणे अशा स्वरूपाचे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी प्रस्ताव तयार केला. तसेच हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला.

या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी मंजुरी दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com