Shocking: बाप की सैतान? आधी ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, मग गळा दाबून हत्या; खोटी कहाणी रचली, पण पोलिसांनी..

Uttarpradesh Gaziabad Crime News: एका नराधम बापाने आपल्याच ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नंतर तिची गळा दाबून निर्घुण हत्या केली. या प्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
crime update
crime updatesaam tv
Published On

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. एका नराधम बापाने आपल्याच ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नंतर तिची गळा दाबून निर्घुण हत्या केली. आपलं पितळ उघड पडू नये म्हणून त्याने शेजारच्या व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदन अहवालामुळे संपूर्ण प्रकरण समोर आलं.

दिल्लीतील गाझियाबाद लोणी परिसरात ही संतापजनक घटना घडली. ज्ञान सिंग असे आरोपीचे नाव आहे. या घटनेसंदर्भात सहाय्यक पोलिस आयुक्त अजय कुमार सिंह म्हणाले, शेजारी शांती देवी यांच्या घरी त्यांच्या कुटुंबाने एक पदार्थ खाल्ला होता. ज्यामुळे पत्नीसह ५ मुलेही आजारी पडली होती. आरोपीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शांती देवीविरुद्ध तक्रार दाखल केली.

crime update
Beed Case: कृष्णा आंधळेकडे म्हत्त्वाचे पुरावे, त्याला पकडणं खूपच गरजेचं; संतोष देशमुखांच्या भावाचा दावा

त्यानंतर चिमुकलीला रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उपचारानंतर, तिच्या उर्वरित पाच मुलांना रुग्णालयातून सोडण्यात आले. आरोपीने त्याच्या मुलीच्या शवविच्छेदनासाठी परवानगी देण्यास नकार दिला होता.

crime update
Nagpur: नागपुरात काय बंद, काय सुरू? ११ पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी कायम; टप्प्याटप्प्याने ढील देणार

पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह दुसऱ्या रुग्णालयात नेले. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार आणि गळा दाबून हत्या केल्याचे सिद्ध झाले. यानंतर, सोमवारी लोणी पोलिसांनी आरोपी ज्ञान सिंगला ताब्यात घेत अटकही केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com