Beed Bus Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, १५ प्रवासी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

Dhule- Solapur Highway Accident: सर्वांवर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचारात सुरू असून जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Beed Bus Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, १५ प्रवाशी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
Beed Bus Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, १५ प्रवाशी जखमी; दोघांची प्रकृती गंभीरSaamtv
Published On

Beed Accident News: बीडमधून (Beed Accident) एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बीडमध्ये एसटी बस आणि मिनी बसमध्ये अपघात झाला. यामध्ये 15 प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accident News)

Beed Bus Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, १५ प्रवाशी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
Success Story: १५ करोडपती, ५२ लखपती.. टोमॅटोच्या उत्पन्नाने 'धुळवडकर' झाले मालामाल; बॅनरची होतेय जिल्ह्यात चर्चा

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बीडमधील धुळे - सोलापूर (Dhule- Solapur Highway) या राष्ट्रीय महामार्गावरील वाणगाव फाट्याजवळ भीषण बस अपघाताची घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि खासगी मिनी बसमध्ये हा भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांवर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचारात सुरू असून जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Beed Bus Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, १५ प्रवाशी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
Raju Shetti In Buldhana : जनतेला फसवणा-या सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार : राजू शेट्टी

दरम्यान, आज सकाळी बुलढाण्यामध्ये (Buldhana) भीषण बस अपघाताची घटना घडली होती. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com