Buldhana News : सरकार नेहमीच घाेषणा करते परंतु मदत कधीच मिळत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या लाेकांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारचे डाेकं ठिकाणावर आणायचे आहे. त्यासाठीच आजचा माेर्चा आहे असे बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. शेट्टी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात आज (शनिवार) भेट दिली. (Maharashtra News)
राजू शेट्टी म्हणाले सरकारने शेतकऱ्यांच्या (farmer) तोंडाला मदतीच्या नावावर पाने पुसली आहेत. सरकार कधीच मदत करत नसतं, सरकार फक्त मदतीची घोषणा करत असतं. त्यामुळे या अतिवृष्टीग्रस्त लोकांना तात्काळ मदत देण्यात यावी अन्यथा आम्ही सरकारच्या उरावर बसू असा इशारा देखील शेट्टींनी नमूद केले.
बुलडाण्याचे (buldhana) पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांना लोकांचं काही देणंघेणं नाही जनता मेली काय आणि राहिली काय यांना काही देणे घेणे नाही ते फक्त राजकारणात मश्गूल आहे दुसऱ्याचा पक्ष फोडण्यात मश्गूल आहेत अशी टीका शेट्टी (raju shetti) यांनी सत्ताधा-यांवर केली.
दरम्यान आज दुपारी संग्रामपूर तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह मोर्चा काढणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.