Nashik Farmer News: दर वर्षीपेक्षा या वर्षी टोमॅटोच्या भावाने उच्चांक गाठल्याने ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. त्यांची तर एक प्रकारे लॉटरीच लागली. काही लखपती तर काही करोडपती झाले. सध्या नाशिक जिल्ह्यातील धुळवड गावची अशीच चर्चा होत आहे.
गावात यावर्षी टोमॅटो विक्रीतून अनेक शेतकरी लखपती, करोडपती झाल्याने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या या आनंदात गावाचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी देखील सहभाग घेतला, त्यामध्ये गावात अभिनंदनाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
टॉमेटोच्या दराने शेतकरी मालामाल...
कांद्याबरोबरच टोमॅटोचं पीक घेण्यात नाशिक जिल्हा नेहमीच अग्रेसर असतो. याच काळात मात्र कधी टोमॅटोचे भाव कोसळले तर कधी गगनाला भिडले तर नाशिकचे शेतकरी नेहमीच चर्चेत येत असतात. मात्र हेच टोमॅटो उत्पादक शेतकरी संपूर्ण देशात टोमॅटोमुळेच पुन्हा चर्चेत आले आहेत. नाशिकच्या धुळवड गावात लागलेल्या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
धुळवड गावातील शेतकरी करोडपती...
धुळवड गावातील १५ शेतकरी ‘करोडपती’ तर ५२ शेतकऱ्यांना ५० लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. तर दररोज या आकडेवारीत भर पडत आहे. गेली अनेक वर्षे शेतात मेहनत करुन काळया मातीत राब राब राबून देखील अनेकदा बळीराजाच्या हाताला काही लागत नव्हते. मात्र यंदा टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी राजा लखपती झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
बॅनरची जिल्ह्यात चर्चा...
गावात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी गावात हे बॅनर लावले आहेत. हे बॅनर सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत असून ‘होय आम्ही करोडपती-लखपती धुळवडकर’ असा आशयाचा बॅनर लक्षवेधी ठरतोय.
आतापर्यंत आपण राजकीय पुढार्यांच्या वाढदिवसाचे तसेच विविध उपक्रमांचे होर्डिंग्ज बघत असतो मात्र आता धुळवडकरांच्या या यशाचे होर्डिंग पहिल्यांदा लागल्याने आख्ख्या जिल्ह्यात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.