Sunetra Pawar: बारामतीत विजयाचा गुलाल उधळणार नाहीत, अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

Sunetra Pawar Emotional Post: बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे. सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत हाती आलेल्या कलामध्ये १ लाख मतांची आघाडी मिळवली आहे. त्यांचा विजय जरी निश्चत असला तरी त्यांनी विजयी मिरवणूक काढू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आह.
Sunetra Pawar: बारामतीत विजयाचा गुलाल उधळणार नाहीत, अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट
Sunetra Pawar Emotional PostSaam Tv
Published On

Summary -

  • बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित

  • सुनेत्रा पवार यांनी १ लाखांहून अधिक मतांची आघाडी मिळवली

  • अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक

  • सोशल मीडियावर पोस्ट करत विजयाचा गुलाल उधळणार नसल्याचे सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक पार पडली. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय होताना दिसत आहे. अकराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख मतांची आघाडी मिळाली आहे. बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजयी मिरवणुका आणि गुलालाची उधळण करू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत.'

Sunetra Pawar: बारामतीत विजयाचा गुलाल उधळणार नाहीत, अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट
बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! 'बिग बॉस' फेम बिचुकले मैदानात; थेट सुनेत्रा पवारांना देणार आव्हान

तसंच, 'दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!', असे सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर जल्लोष केला जाणार नाही.

Sunetra Pawar: बारामतीत विजयाचा गुलाल उधळणार नाहीत, अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट
Baramati bypoll : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार गाठणार "मॅजिक फिगर"? अजितदादांचा विक्रम मोडला जाणार?

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी १ लाख मतांचा टप्पा ओलांडला. बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ३ हजार ७०९ मतांची आघाडी मिळाली. बाराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८०५७ मतं मिळाली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित झाला आहे. एकूण २३ फेऱ्यांपैकी १२ फेऱ्यांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये सुनेत्रा पवार यांचीच आघाडी आहे. दुपारी २.३० पर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Sunetra Pawar: बारामतीत विजयाचा गुलाल उधळणार नाहीत, अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट
Baramati rahuri bypolls election results: 14 व्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 58 हजार 197 मतांची आघाडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com