Samruddhi Mahamarg News: राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. त्यामुळे काही वाहनांना यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आज चक्क ७ ते ८ बैलगाड्या या महामार्गावर धावताना दिसल्या. (Latest Samruddhi Mahamarg News)
मिळालेल्या माहितीनुसार, आज समृद्धी महामार्गावर सकाळी काही बैलगाड्या धावताना दिसल्या. महामार्गाच्या नियमांचे पालन करण्यासाठी इथे एक पथक नेमन्यात आले आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे उलंघन करणाऱ्या व्यक्तींवर इथे कारवाई होईल असे लोकार्पण सोहळ्यात सांगण्यात आले होते. मात्र आज बैलगाड्या माहार्गावर आलेल्या असताना कोणतेही पथक उपस्थित नव्हते. त्यामुळे महामार्गाच्या नियमांचे उलंघन होत असल्याचे पाहायला मिळाले.
महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात झाले. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. समृद्धी महामार्गावर १२० स्पीडची मर्यादा आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी (Shirdi) ते नागपूरपर्यंत आठवडाभरातच ३० अपघात झाले. त्याशिवाय सहा वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर जरा वेग आवरा म्हणण्याची वेळ आली.
उद्घाटनानंतर हा मार्ग सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) रिक्षा, ट्रॅक्टर, दुचाकी यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र आज या महामार्गावर बैल गाड्या कशाकाय आल्या? आसा प्रश्न उपस्थित होत आहे.
समृद्धी महामार्गाची वैशिष्टये -
• लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५ • लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड) • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२ • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६ • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.