पालकांनो, तुम्ही तुमच्या लहान मुलांना फुगा खेळण्यासाठी देताय का? लहान मुलांना खेळण्यासाठी फुगा देत असाल तर सावधान. हा फुगा कदाचित मुलाच्या जीवावर येऊ शकतो. पालघर जिल्ह्यातीतल भगत पाड्यात राहणाऱ्या एका तीन वर्षीय मुलाचा फुग्यामुळे मृत्यू झालाय.(Latest News)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम भागातील आदिवासी भगतपाड्यात धक्कादायक घटना घडली. हर्ष बुधर, असं या मृत मुलाचं नाव आहे. फुगा गिळल्याने एका तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. हर्ष संध्याकाळच्या वेळी आपल्या मित्रांसोबत खेळत होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यावेळी त्याच्याकडे असलेला फुगा त्याने गिळला.काही वेळानंतर हर्षला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ही बाब घरच्यांना समजली त्यांनी हर्षच्या मित्रांकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने फुगा गिळल्याचं माहिती हर्षच्या मित्रांनी दिली, त्यानंतर कुटुंबियांनी हर्षला रुग्णालयात नेलं. परंतु रुग्णालयात पोहोचण्यास वेळ लागल्याने त्याचा रस्त्यावरच मृत्यू झाला.
नागपूरमधील मुलाचाही फुग्याने घेतला होता जीव
नागपूर येथे गळ्यात फुगा अडकल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विजय पटेल असे या वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. बोलता-बोलता फुगा त्याच्या गळ्यात फसला. विजयला फुगा गळ्यात अडकल्याने श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले.
बाल्कनीत खेळणं आलं अंगाशी
ठाण्यातील मानपाडा येथील MMRDAइमारतीच्या माळ्यावर दोन मुले अडकल्याची घटना घडली. दरम्यान येथील स्थानिकांनी या दोन्ही मुलांना वाचवलं आहे. ही मुले पहिल्या मजल्यावरील खुल्या बाल्कनीत खेळत होती. परंतु त्यांना खाली उतरता येत नसल्याने ते तेथे अडकून बसले होते. दरम्यान या दोन्ही मुलांना वाचविण्यात यश आलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.