फुग्याशी खेळणे जीवावर बेतलं, गळ्यात फुगा अडकल्याने चिमुकल्याच्या मृत्यू

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
गळ्यात फुगा अडकल्याने चिमुकल्याच्या मृत्यू
गळ्यात फुगा अडकल्याने चिमुकल्याच्या मृत्यूSaam Tv
Published On

नागपूर - नागपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गळ्यात फुगा अडकल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विजय पटेल असे या वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. विजयच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. पटेल कुटुंबीय नंदनवनमधील स्वराज विहार कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहतात.

हे देखील पहा -

सोमवारी विजय फुगा फुगवत होता. बोलता-बोलता फुगा त्याच्या गळ्यात फसला. विजयला फुगा गळ्यात अडकल्याने श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. ऐन दिवाळी सणात घरातील दिवा मालवल्याने पटेल कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com