Rajasthan Tragedy: हृदयद्रावक! लपाछपीचा खेळ जिवावर बेतला; २ बहिणींचा फ्रीजमध्ये गुदमरून मृत्यू

Rajasthan News: राजस्थानमध्ये हृदय हेलावणारी घटना घडली आहे. एकाच घरातील दोन चिमुकल्या बहिणींचा फ्रीजमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Rajasthan Tragedy
Rajasthan TragedySaam DIGITAL

Rajasthan News

राजस्थानमध्ये हृदय हेलावणारी घटना घडली आहे. एकाच घरातील दोन चिमुकल्या बहिणींचा फ्रीजमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan Tragedy
Rajasthan News : राजस्थानमध्ये पोलिसांच्या कारची ट्रकला धडक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना राजस्थान येथील खमनोर परिसरातील बलीचा गावातील आहे. एकाच घरातील दोन चिमुकल्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लपाछपीचा खेळ जीवावर बेतू शकतो, याची साधी कल्पनाही त्यांना नसेल.

..तोपर्यंत उशीर झाला होता

दोघीही खेळता खेळता फ्रीजमध्ये जाऊन लपल्या आणि आतून फ्रीज बंद केला. लपल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असेल, पण त्यांना बाहेर येता आले नाही. घरात असं काही झालंय हे कळेपर्यंत खूपच उशीर झाला होता, असे सांगण्यात येत आहे.

दोघींचा शोध घेतला, पण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चिमुकल्या या चुलत बहिणी आहेत. त्या घरात लपाछपी खेळत होत्या. आपल्या पालकांसोबत एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तिथंच ही धक्कादायक घटना घडली. मुली खेळत असताना त्यांचे पालक कार्यक्रमामध्ये व्यग्र होते.

मृत चिमुकल्यांच्या पालकांना आपल्या मुली कुठेही दिसत नसल्याचे समजले. त्यांनी दोघींचा शोध घेण्यास सुरूवात केली. बराच वेळ त्यांचा शोध घेतल्यानंतर दोन्ही मुली फ्रीजमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या.

फ्रीजमध्ये अडकल्याने गुदमरून पायल (वय १०) आणि रितिका (वय ११) यांचा मृत्यू झाला. मृत रितिकाचे वडील शंभू सिंह मुंबई येथे कामानिमित्त आहेत, तर पायलचे वडील बसचालक आहेत. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Rajasthan Tragedy
Rajasthan News: क्षणात अख्ख कुटुंब संपलं! विजेच्या धक्क्याने एकाच घरातील चौघांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com