Electricity MSEDCL
Electricity MSEDCLSaam TV

Rajasthan News: क्षणात अख्ख कुटुंब संपलं! विजेच्या धक्क्याने एकाच घरातील चौघांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

Rajasthan Latest News: एकमेकांना वाचवण्याच्या नादात घरातील सर्वजण विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले.
Published on

Rajasthan News:

देशभरात सध्या दिवाळीच्या सणाची लगबग सुरू आहे. सर्वत्र दिवाळीच्या खरेदीचा, फराळाचा उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळत आहे. अशातच राजस्थानमधून एक काळीज पिळवटुन टाकणारी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या सालुंबरमध्ये विजेचा शॉक लागून एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर जिल्ह्यातील लसादिया भागातील ढिकिया ग्रामपंचायतीच्या बोदफळा गावात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. घरासमोरील विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले.

ज्यामुळे विद्युत प्रवाह थेट घराच्या लोखंडी गेटमध्ये उतरला. या विद्युत प्रवाहाचा झटका पहिल्यांदा औंकर मीनाला बसला. विजेच्या धक्क्यानंतर आरडाओरडा ऐकून घरातील इतर सदस्यही तिच्या मदतीसाठी धावले. एकमेकांना वाचवण्याच्या नादात घरातील सर्वजण विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले. ज्यामध्ये चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. (Crime News)

Electricity MSEDCL
Ratnakar Gutte News: मराठा बांधवानी रोखला आमदारांचा कार्यक्रम; आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतली भूमिका

औंकर मीना, त्यांची पत्नी भामरी, मुलगा देवीलाल आणि मुलगी मांगी अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एकीकडे दिवाळीची धामधुम सुरू असतानाच नियतीने घात केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

Electricity MSEDCL
Rain in Maharashtra: ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस! बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांची उडाली धांदल, पुढील ४८ तासांत राज्यातील हवामान कसं असेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com