Fraud In Online Gaming App: मोबाईलवर गेम खेळताय ? वेळीच सावध व्हा! Gaming App वरून व्यवसायिकाला तब्बल ५८ लाखांचा गंडा

केसिनो, रमी, तीन पत्ते, क्रिकेट अशा प्रकारच्या काही ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपला सरकारनं परवानगी दिलीये.
Fraud In Online Gaming App
Fraud In Online Gaming AppSaam TV
Published On

संजय डाफ

Gaming App: ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची प्रकरणं आपण अनेकदा बघितली आहे. मात्र, नागपुरात याच गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला तब्बल 58 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. अ‍ॅपच्या माध्यमातून आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये. (Latest Gaming App News)

केसिनो, रमी, तीन पत्ते, क्रिकेट अशा प्रकारच्या काही ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपला सरकारनं परवानगी दिलीये. मात्र, अशा प्रकारचे काही फ्रॉड अ‍ॅप तयार करुन कोट्यवधी रुपयांची सर्रास फसवणूक केली जात आहे.

Fraud In Online Gaming App
Navi Mumbai Crime: आईच्या हत्येचा तपास सुरू होता, मुलीच्याही खुनाचा झाला उलगडा; एका फोनमुळं मारेकरी जावई गजाआड

नागपुरातील एक व्यापारी दीड वर्षांपूर्वी हे अ‍ॅप चालवणाऱ्या आरोपीच्या संपर्कात आला होता. या गेमिंग अ‍ॅपमधून कोट्यवधी रुवयांची कमाई होते, असं या व्यक्तीला सांगण्यात आलं होतं. व्यापाऱ्याने खेळायला सुरुवात केल्यावर सातत्याने तो पैसे हरत गेला. कारण या अ‍ॅपच्या लिंकमध्ये सेटिंग आणि मॅन्युपुलेट केले होते.

हे 'डॉक्टर्ड' अ‍ॅप अशा पद्धतीने तयार केले होते की त्यात खेळणारा व्यक्ती आणखीन अडकत जातो. अशा पद्धतीने हा व्यापारी 58 कोटी रुपये या गेमिंग अ‍ॅपमध्ये हरला. दरम्यान, आर्थिक अडचणीत आल्याने त्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली. गोंदियाच्या अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन हा व्यक्ती सदर अ‍ॅप चालवत असल्याचं लक्षात आलं.

Fraud In Online Gaming App
Hemangi Kavi Watch Adipurush: चाळीशी पार केलेल्या हेमांगीला थिएटरमध्ये चित्रपट पाहताच आला नाही; पोस्ट करत मांडली खदखद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरून 10 कोटी पेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आलीये. मात्र, आरोपी दुबईत पळून गेलाय. या अ‍ॅपची लिंक केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार अधिक तपास करतायत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com