NCP : राष्ट्रवादी काॅंग्रेसला पुढील 15 वर्ष सत्तेसाठी तळमळत बसावे लागेल असे वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच सातारा येथे केले हाेते. त्यावर आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयात देसाईंच्या विधानावर उत्तर दिले. ते म्हणाले ही प्रक्रिया सुरुच राहते. (Balasaheb Patil Latest Marathi News)
माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) म्हणाले सत्ता येत राहती आणि जात राहती. ती काेणीही गृहीत धरु नये. ज्या मार्गाने शिवसेनेचे आमदार (shambhuraj desai) त्या ठिकाणी गेले आणि भाजपचा जाे अजेंडा हाेता त्यातून हे सरकार निर्माण झाले आहे. काेण किती कालावधीत सत्ते राहील हे काेणी सांगू शकणार नाही. (Maharashtra News)
पाटील म्हणाले आत्ता शेतक-यांच्या बाबतीत दुर्लक्ष केले जात आहे. साधे पंचनामे झाले नाहीत. आत्ता त्यांची संख्या जादा आहे म्हणून ठीक आहे. लाेकशाहीत सगळं बदलतं असे यावेळी उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.