बियर बार मालकावर हल्ला, ICU त दिली जिवे मारण्याची धमकी; कारवाई न झाल्यास उद्या सर्व बार राहणार बंद

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.
Akola Crime News , Police
Akola Crime News , PoliceSaamTv

Akola Crime News : दारू पिऊन पैसे न देता खंडणी मागणाऱ्या मद्यधुंद चार युवकांनी अकोल्यातील (akola) न्यू नितीन बारच्या संचालक नितीन शाहकार यांच्यावर बारमध्ये प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. (Breaking Marathi News)

चार युवकांनी अकोल्यातील न्यू नितीन बारमध्ये दारू पिल्यानंतर बिला संबंधी काऊंटरवर वाद घातला. त्यानंतर युवकांनी बार मालकाला खंडणीची मागणी केली. बार मालकाने नकार दिल्यानंतर युवकांनी (youth) मालकावर काचेचा ग्लास फेकून मारला. त्यात बार मालक गंभीर जखमी झाला. (Maharashtra News)

Akola Crime News , Police
Vasai Bhuigaon Beach : समुद्र किनारी कार फिरविण्याचा स्टंट पर्यटकांच्या अंगलट

त्यानंतर युवक तेथून पसार झाले. बार मालक नितीन यांना कर्मचा-यांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. तेथेही चार युवक पाेहचले त्यांनी थेट आय.सी.यु. मध्ये जाऊन बार मालकाला जिवे मारण्याची धमकी दिली. (akola latest marathi news)

Akola Crime News , Police
Jamb Samarth News : जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी एलसीबीने कर्नाटकातून दाेघांना घेतलं ताब्यात

या घटनेच्या विरोधात बारमालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पाेलिसांनी (police) कारवाई न झाल्यास उद्या एक दिवसाचा बंद बार मालकांनी पुकारला आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Akola Crime News , Police
Khamgoan : खामगावातील भीषण आगीत आठ दुकाने जळून खाक; अकोला, शेगावची फायर ब्रिगेड यंत्रणा धावली मदतीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com