Vasai News : वसईच्या भुईगाव समुद्र किनारी कार मिरविणे एका पर्यटकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. संबंधित पर्यटकाची कार वाळूत अडकली आणि त्यानंतर भरतीच्या पाण्यात कारला (car) जलसमाधी मिळाली. अथक प्रयत्नानंतर कार पाण्याच्या बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं. (vasai latest marathi news)
वसई पूर्वेच्या वालीव परिसरातून अनिल कुमार सिंग हे आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसह भुईगाव समुद्र किनारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी ते कार घेऊन समुद्र किनाऱ्यावर पाेहचले. मात्र समुद्राच्या पाण्यापर्यंत ही कार नेताना ती वाळूत अडकली. (Breaking Marathi News)
सर्वांनी कार बाहेर काढायचा प्रयत्न केला मात्र वाळूत ती रुतली व पूर्णपणे अडकली गेली. काल रात्रीपासून ही कार भरतीच्या पाण्यात जलसमाधी घेऊन होती. संध्याकाळी थोडे पाणी ओसरल्यानंतर दोन ट्रॅक्टरच्या मदतीने कारला पुन्हा बाहेर काढायचे ग्रामस्थांनी (villagers) प्रयत्न केले.
परंतु ग्रामस्थांना त्यात यश आले नाही. अखेर 24 तासांहून अधिक काळानंतर गुरुवारी रात्री उशिरा जेसीबीच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी ग्रामस्थांसह पर्यटकांनी जेसीबी यंत्रणावाल्यांचे आभार मानले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.