Mumbai In Fire: कुर्ल्यातील गुलाब शहा इस्टेट गोदमांमध्ये लागलेली आग नियंत्रणात; जीवितहानी नाही, मात्र कोट्यवधींचे नुकसान

Fire In Gulab Shah Estate warehouses Kurla: मागील 2 तासंपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
Fire In Gulab Shah Estate warehouses Kurla
Fire In Gulab Shah Estate warehouses KurlaTwitter/@ANI

रुपाली बडवे, मुंबई

Fire In Mumbai: मुंबईतील कुर्ला परिसरात भीषण आग लागली होती. कुर्ल्यातील गुलाब शहा इस्टेट येथील गोदमांमध्ये ही भीषण आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे 10 ते 15 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. मागील 4 तासंपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. अखेर ही आग आटोक्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले आहेत. (Mumbai Latest News)

Fire In Gulab Shah Estate warehouses Kurla
'टाटा एअरबस' प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे, रोहित पवारांनी शिंदे सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, खोके सरकारवर...

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही आग रात्री साडेतीनच्या सुमारास लागली होती. LBS कुर्ला पश्चिम येथे रस्त्यावर या परिसरात अनेक कपडे, कम्प्युटर पार्ट, प्लास्टिक साहित्य, भंगार साहित्य अशी गोदामे अनेक आहेत. त्यामुळे ही आग वाढतच गेली. यावेळी संपूर्ण परिसर धुराने भरला होता. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले, त्यानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणीतही जीवितहानी झाल्याचं अद्यापतरी समोर आलेलं नाही. मात्र, या आगीत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com