'टाटा एअरबस' प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे, रोहित पवारांनी शिंदे सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, खोके सरकारवर...

'रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे.'
'टाटा एअरबस' प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे, रोहित पवारांनी शिंदे सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, खोके सरकारवर...

Tata Airbus Project : वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तर यापेक्षा मोठा प्रकल्प आपण राज्यात आणू त्याबाबत आपलं पंतप्रधानांशी बोलणं झालं आहे. अशी सारवासारव त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती.

मात्र, आता आणखी टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला (Gujarat) गेल्यामुळे पुन्हा एकदा शिंदे सरकारवरती विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. टाटा एअरबस हा तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे सरकारला टीकेला सामोरं जावं लागणार आहे.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो.

पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहीये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असं ट्विट करत आदित्य यांनी उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर टीका केली आहे.

तर ज्याप्रमाणे रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे. असं ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान टाटा एअरबेस प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. मात्र, मागील एका मुलाखतीत उदय सामंत टाटा एअरबस महाराष्ट्रात आणणार असल्यचं वक्तव्य केलं होतं. मात्र, प्रत्येक्षात हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com