Abdul Sattar : आदित्य ठाकरे म्हणजे 'छाेटा पप्पू', गाेधडीतून बाहेर आलेले आता बाेलू लागलेत : अब्दुल सत्तार

गेले दाेन दिवस अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आराेप झालेत.
abdul sattar , aditya thackeray
abdul sattar , aditya thackeraysaam tv

Abdul Sattar News : बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा (Radha Vinod Sharma) यांना बैठकीदरम्यान चहा पिता का आणि त्यानंतर दारू पिता का असे विचारणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. हिंगोलीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी साम टीव्हीच्या प्रश्नावर मी चहा पिता का असं म्हटलं हाेते असे म्हणाले. दरम्यान मंत्री सत्तार यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना छाेटा पप्पू असे संबाेधिले आहे. (Abdul Sattar Latest Marathi News)

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज हिंगोलीत (hingoli) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले आहेत. सत्तार यांनी साम टीव्हीच्या प्रस्तुत प्रतिनिधीच्या प्रश्नांना उत्तर देताना मी जिल्हाधिकारी यांना चहा पिता का असे म्हटले. आपण दारू प्या असे म्हणालोच नव्हतो असे म्हणत स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान अंबादास दानवे यांच्यावर सत्तार यांनी टीका करत त्यांना काय समजतं. हा काय फार माेठा विषय आहे का असं म्हटलं.

abdul sattar , aditya thackeray
बियर बार मालकावर हल्ला, ICU त दिली जिवे मारण्याची धमकी; कारवाई न झाल्यास उद्या सर्व बार राहणार बंद

आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी सत्तार (abdul sattar) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केल्याचे माध्यमांनी लक्ष वेधले. त्यावर सत्तार यांनी काेण ताे छाेटा पप्पू असे म्हटलं. सत्तार म्हणाले छाेटा पप्पू काही ही बाेलू शकताे. आम्ही शेतक-यांसाठी कार्य करीत आहाेत. अऩेक वर्ष मी शेतक-यांसाठी काम करीत आहे.

abdul sattar , aditya thackeray
Satara Breaking News : काेयना परिसरात भूकंपाचा धक्का

हे गाेधडीत असताना आम्ही शेतक-यांच्या बांधावर पाेहचलाे. शेतक-यांना मदत व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. गाेधडीतून बाहेर आलेले आता बाेलू लागले आहेत. लाेकांमध्ये संभ्रम निर्माण करताहेत असे सत्तारांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com