Bachchu Kadu: प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा; आरक्षणावरील चर्चेदरम्यान बच्चू कडू यांचं मोठं विधान

Bachchu Kadu on Prakash Ambedkar in Nagpur Hiwali Adhiveshan : हिवाळी अधिवेशनात त्यावर सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, असं विधान केलं.
Bachchu Kadu on Prakash Ambedkar
Bachchu Kadu on Prakash Ambedkar
Published On

bacchu kadu on Prakash Ambedkar:

मराठा आरक्षणाच्या मागणीचे पडसाद विधानभवनाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागपुरातील विधानभवनातील हिवाळी अधिवेशनात त्यावर सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, असं विधान केलं. (Latest Marathi News)

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आरक्षणावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बच्चू कडू यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, 'मला वाटतंय की, राज्यात शांतता ठेवायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वशंज प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्यमंत्री करायला हवं. म्हणजे या देशाला खरा न्याय दिला, आपल्याला घटना दिली, त्यांच्यासाठी एवढं तरी करायला हवं. असं काही केलं तर काय हरकत आहे. त्यामुळे राज्य शांत राहील'.

Bachchu Kadu on Prakash Ambedkar
Shiv Sena Crisis: शिवसेना कोणाची? आता थेट नवीन वर्षात कळणार, सुप्रीम कोर्टाने सुनावणीची तारीख केली जाहीर

नेत्यांनी व्यक्तिगत टीका करू नये : बच्चू कडू

'मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की, त्यांनी व्यक्तिगत टीका करू नये. चांगलं नाही. एका समाजाचा प्रश्न घेऊन निघाले आहेत. कोणी काही बोलू द्या. त्यांनी कोणावर टीका करू नये. एखादा नेता बोलला तर त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागतो. त्यामुळे आपण सर्व चांगल्या मार्गाने भांडलं पाहिजे, अशी विनंती बच्चू कडू यांनी यावेळी सर्व नेत्यांना केली.

Bachchu Kadu on Prakash Ambedkar
Old Pension: राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनेच्या बैठकीत काय झाली चर्चा?

'आपलं राज्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, अहिल्याबाई होळकर यांच आहे. एकमेकांमध्ये भांडलं तर कोणत्या तोंडाने आपण देशाला तोंड दाखवू? आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. तुम्ही आरक्षणावरून आपापसात भांडत आहात. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर आणि मनोज जरांगे यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी भांडावं. त्याला काय हरकत आहे, असंही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com