Shiv Sena Crisis: शिवसेना कोणाची? आता थेट नवीन वर्षात कळणार, सुप्रीम कोर्टाने सुनावणीची तारीख केली जाहीर

Shiv Sena Crisis Supreme Court: एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात आता थेट पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे. फेब्रुवारी 2024 रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
Shiv Sena Crisis Supreme Court
Shiv Sena Crisis Supreme CourtSaam TV
Published On

>> प्रमोद जगताप, दिल्ली

Shiv Sena Crisis Supreme Court Hearing:

एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात आता थेट पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबर रोजी हे प्रकरण लिस्टेड झाल होतं. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

तत्पूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. याच निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ज्यावर आता नवीन वर्षात सुनावणी होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena Crisis Supreme Court
Parliament Candle Attack: काँग्रेस नेत्याने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न केला उपस्थित, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

दरम्यान, विधिमंडळात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीही सुरू आहे. यातच शिवसेना आमदार (शिंदे गट) भारत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सुनावणीदरम्यान मंगळवारी भरत गोगावले यांनची उलट तपासणी केली.  (Latest Marathi News)

कामात यांनी गोगावले याना प्रश्न विचारलक की,'तुम्ही सूरतच हेच ठिकाण का निवडलं? यावर गोगावले म्हणाले, 'सूरत हे चांगलं ठिकाण आहे, असं मी ऐकलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज देखील सूरतला गेले होते' असं त्यांनी उत्तर दिलं.

Shiv Sena Crisis Supreme Court
Parliament Security : १२०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या संसदेची सुरक्षा कशी असते? Y,Z आणि Z Plusपेक्षा किती वेगळी?

त्यांच्या या उत्तरावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, 'छत्रपती शिवाजी महाराज वखारी लुटायला गेले होते. औरंग्याचे नाक कापायला शिवाजी महाराज गेले होते. पण या लोकांनी कोणाचे नाक कापले. शिवाजी महाराज 50 खोक्यांसाठी पळून गेले नव्हते. शिवाजी महाराज गद्दारी करून गेले नव्हते. हे गणोजी शिर्के आहे, सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे आहेत. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. हे गद्दार लोक, स्वराज्य लुटणारे लोक शिवाजी महाराज यांची तुलना करणार का?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com