Parliament Security : १२०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या संसदेची सुरक्षा कशी असते? Y,Z आणि Z Plusपेक्षा किती वेगळी?

Parliament Security : संसदेची सुरक्षा तीन स्तरांवर केली जाते. संसदेच्या परिसराची जबाबदारी ही दिल्ली पोलिसांच्या हाती असते. तर दुसऱ्या स्तरावरील सुरक्षेची जबाबदारी पार्लियामेंट ड्युटी ग्रुपची असते. तिसऱ्या स्तरावरील सुरक्षेची जबाबदारी ही पार्लियामेंट सिक्युरिटी सर्व्हिसवर असते.
Parliament Security
Parliament SecuritySaam Tv
Published On

Security Of Parliament :

संसदेच्या हिवाळी सत्रादरम्यान दोन आंदोलकांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत सभागृहात घोषणाबाजी केली. कामकाज सुरू असताना या तरूणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. सभागृहात गोंधळ घालत या तरूणांनी संसदेच्या सुरक्षेची धिंडवडे उडवले. दरम्यान गोंधळ घालणाऱ्या तरूणांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली जात आहे. नवीन संसद १२०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलीय. या संसदेला जबरदस्त सुरक्षा पुरवली जाते. ही सुरक्षा कशा प्रकारची असते, याची माहिती घेऊ.. (Latest News)

तीन पातळींवर केली जाते सुरक्षा

संसदेची सुरक्षा तीन स्तरावरून केली जाते. संसदेच्या बाहेरील परिसराची सुरक्षा दिल्ली पोलीस करत असते. जर कोणी संसदेत घुसखोरी करत असेल तर त्याला दिल्ली पोलीस ताब्यात घेतात. त्यानंतर दुसरी पातळीवरील सुरक्षेची जबाबदारी ही पार्लियामेंट ड्युटी ग्रुपची असते. तर तिसऱ्या पातळीवरील सुरक्षेची जबाबदारीही पार्लियामेंट सिक्युरिटी सर्व्हिसची असते. पार्लियामेंट सिक्युरिटी सर्व्हिस राज्यसभा आणि लोकसभेसाठी वेगवेगळी असते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संसदेची सुरक्षा सेवा (पार्लियामेंट सिक्युरिटी) कशी कार्य करते?

राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागगृहांकडे आपली वैयक्तिक पार्लियामेंट सिक्युरिटी सर्व्हिस असते. पार्लियामेंट सिक्युरिटी वर्ष २००९ मध्ये लागू करण्यात आली होती. याआधी वॉच अॅण्ड वॉर्ड नावाने ही सुरक्षा यंत्रणा ओळखली जात होती. सिक्युरिटी सर्व्हिसवर संसदेत प्रवेश करण्यास परवानगी देणं, तसेच लोकसभा अध्यक्ष, उपसभातींना सुरक्षा देण्याची जबाबदारी असते.

Parliament Security
Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदली, २ अज्ञातांनी अचानक सभागृहात मारल्या उड्या, स्मोक कँडल फोडल्या, खासदारांची पळापळ

पत्रकार आणि सामन्य नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं कामदेखील या सर्व्हिसवर असतं. तसेच प्रमुख नेते आणि संविधानिक पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची गर्दी नियंत्रित करण्याचे कामदेखील या यंत्रणेवर असतं. त्याचबरोबर संसदेत प्रवेश करणाऱ्या खासदारांना ओळखणं. त्यांच्या वस्तू फ्रिस्किंग करणं, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती, राष्ट्रपती आदी प्रमुख लोकांच्या सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात ही यंत्रणा राहत असते.

Y, Z, Z Plus सुरक्षेपेक्षा वेगळी असते

व्हीआयपी आणि मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा म्हणजे वाय, झेड आणि झेड प्लस. या सुरक्षेपेक्षा संसदेत देण्यात येणारी सुरक्षा खूप वेगळी असते. गृहमंत्री आणि पंतप्रधानांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते. तसेच वेगवेगळ्या व्हिआयपी लोकांना वेगवेगळी सुरक्षा पुरवली जाते. ही सुरक्षा विशिष्ट व्यक्तींसाठी असते. तर पार्लियामेंट सिक्युरिटी ह्या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात केल्या जातात.

त्याचबरोबर ज्या मंत्र्यांना वाय, झेड किंवा झेड प्लस सुरक्षा असते, त्यांनाही संसदेत प्रवेश करताना आपली सुरक्षा बाहेर सोडावी लागते. संसदेच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर मंत्र्यांना पार्लियामेंट सिक्युरिटी आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षा घ्यावी लागते.

Parliament Security
Latur Amol shinde : पोलीस भरतीची तयारी करणारा अमोल शिंदे महाराष्ट्रातील लातूरचा; गावातही नसतो, आईवडील करतात मजुरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com