(संदीप भोसले)
संसदेतील लोकसभेच्या सभागृहात शून्य तासाचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांची आसनव्यवस्था असलेल्या बाकांवर उड्या मारल्या. खासदार बसलेल्या बाकांवरून उड्या मारत ते पुढे पोहोचले. या तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. या तरूणांना खासदारांनी पकडलं आणि त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. (Latest News)
अमोल शिंदे (Amol Shinde) हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील झरी (बुद्रूक) येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अमोल शिंदे (Amol Shinde in Latur) यांचे आईवडील मोलमजुरी करतात. अमोल हा गेल्या अनेक दिवसांपासून गावात राहत नव्हता. पोलीस भरतीच्या तयारीसाठी तो दुसऱ्या गावाला राहत होता, असेही सांगण्यात येत आहे. अमोल शिंदेने हे आंदोलन का केले? याचा तपास केला जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दूरध्वनीवरून तातडीने महाराष्ट्रातील त्या तरुणाची (Amol Shinde From Latur) माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलीस अमोलच्या घरी पोहोचले असून, त्याच्या आई-वडिलांची चौकशी करत आहेत.
काय घडला प्रकार
संसदेचं हिवाळी सत्र सुरू असून आजही नेहमीप्रमाणे लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या. एका बाकावरून दुसऱ्या बाकावर उड्या मारत हे तरूण खासदाराच्या जवळ पोहोचले. दोन युवकांपैकी एकाने आपल्या बुटातून स्प्रे काढत संपूर्ण सभागृहात धूर केला. संसदेच्या बाहेर देखील काही तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. यात लातूरच्या तरुणाचा समावेश होता. लोकसभेत धुराच्या नळकांड्या फोडणारे दोन्ही तरुणांची ओळख पटलीय.
सभागृहात धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या तरूणांची नावे, सागर शर्मा , मनोरंजन डी, राहणार विद्यानगर, म्हैसूर कर्नाटक येथील आहेत. तर संसदेच्या परिसरात धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्यांची नावे नीलन कौर वय वर्ष ४२ हिस्सार, अमोल शिंदे (Who is Amol Shinde), लातूर महाराष्ट्र अशी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.