Parliament Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही गदारोळ, राज्यसभा आणि लोकसभा पुढील अधिवेशनापर्यंत तहकूब

Budget Session: राज्यसभा आणि लोकसभा पुढील अधिवेशनापर्यंत तहकूब
Central Government Budget Session
Central Government Budget SessionSansad Tv
Published On

Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होताच अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर जेपीसीच्या मागणीवरून दोन्ही सभागृहात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आणि लोकसभेचे कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत तहकूब करण्यात आला आहे.

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर दिल्लीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसद ते विजय चौक असा ‘तिरंगा मार्च’ काढला. (Latest Marathi News)

Central Government Budget Session
Roshani Shinde मारहाण प्रकरणी महिला आयोगाचं Thane आयुक्तांना पत्र!

चहापाण्याचा कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेचे कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत तहकूब केल्यानंतर काँग्रेससह 13 राजकीय पक्षांनी आज लोकसभा अध्यक्षांनी आयोजित केलेल्या संध्याकाळच्या चहापाण्याचा कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्च रोजी सुरू झाला होता. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज एक दिवसही पूर्ण होऊ शकले नाही. अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी आणि राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीवरून दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

सभागृहाचे कामकाज कधी व किती वेळ चालले?

लोकसभेचे कामकाज 13 मार्च रोजी केवळ 17 मिनिटे चालले होते. यानंतर 14 मार्चला 10 मिनिटे, 15 मार्चला 15 मिनिटे, 16 मार्चला केवळ 3 मिनिटे, 17 मार्चला 21 मिनिटे, 18, 19 आणि 20 मार्चला 14 मिनिटे चालले. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सदस्यांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 21 मार्च रोजी केवळ 30 मिनिटे चालू शकले. विविध सदस्यांच्या प्रस्तावानंतर 22 मार्च रोजी सभागृहात एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली.

राहुल गांधींच्या सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे 23 मार्च रोजी सभागृहाचे कामकाज केवळ 23 मिनिटे, 24 मार्चला 45 मिनिटे चालले. या गदारोळामुळे पुन्हा एकदा 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आले. यानंतर 27 मार्चला 10 मिनिटे आणि 28 मार्चला फक्त सहा मिनिटे काम होऊ शकले.

Central Government Budget Session
RAM 1500 REV: एका चार्जमध्ये धावणार तब्बल 800 किमी, मिळणार ऑल व्हील ड्राइव्हची मजा! येत आहे नवीन इलेक्ट्रिक पिकअप ट्रक

अधिवेशनाच्या 12व्या दिवशी 29 मार्च रोजी काँग्रेस नेते काळे कपडे घालून संसदेत पोहोचले. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी 'लोकशाही वाचवा'चे पोस्टर दाखवले. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब करावे लागले. 5 एप्रिलला अधिवेशनाच्या 13व्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com