Nashik News: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात ATS ची एन्ट्री? निदा खानचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन?

Nashik Corporate Jihad Case: नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आता ATS ची एन्ट्री झाली आहे. निदा खानचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
Nashik News: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात ATS ची एण्ट्री? निदा खानचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन?
Nashik Corporate Jihad CaseSaam Tv
Published On

Summary -

  • नाशिक प्रकरणात एटीएसची एन्ट्री

  • तपास अधिक गंभीर खुलासे होण्याची शक्यता

  • दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शनचा संशय

  • नोकरीच्या आमिषाने मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रकार

भरत मोहोळकर, साम टीव्ही

नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आता दहशतवादविरोधी पथकाची एण्ट्री झालीय. त्याचं नेमकं कारण काय? आयटी कंपनीतील एचआरचं दहशतवादी कनेक्शन काय आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

नाशिकच्या आयटी कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आता थेट एटीएसची एण्ट्री झालीय. कारण मुख्य आरोपी शफी शेख आणि रजा मेमन यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आणि आपला खाक्या दाखवला. त्यानंतर हे आरोपी पोपटासारखं बोलायला लागले. त्यांनी दिलेल्या माहितीतूनच फरार एचआर निदा खानचं दिल्ली बॉम्ब स्फोटातील आरोपी डॉक्टर शाहीनशी कनेक्शन असल्याचा संशय बळावला. त्यामुळे नाशिकमधील प्रकरणातून फक्त धर्मांतरण नाही तर थेट राष्ट्रीय सुरक्षेवर घाला घालण्याचा कुटील डाव असल्याचं समोर आलंय.

Nashik News: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात ATS ची एण्ट्री? निदा खानचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन?
Nashik Travel : नाशिकला गेलाय? 'हे' आहे निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट वीकेंड गेटवे लोकेशन, उन्हाळ्यात घ्या थंडगार हवा

निदा खानच्या दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन असल्याच्या संशयामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत... यात एटीएसने कॉल डिटेल रेकॉर्ड्स, डिजिटल संवाद आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जातेय. एवढंच नाही तर तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आलीय. पीडित तरुणींना थेट मलेशियाला पाठवून मानवी तस्करीचाही संशय व्यक्त केला जातोय.. एवढंच नाही तर या प्ररकरणातील आरोपी इम्रान हा मलेशियात लपून बसल्याचा आरोप भाजप आमदार देवयानी फरांदेंनी केलाय.

Nashik News: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात ATS ची एण्ट्री? निदा खानचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन?
Nashik : मोठी बातमी! TCSचे ऑफिस बंद, सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

या कॉर्पोरेट जिहादची एक मोडस ऑपरेंडी होती. आधी तरुणींना नोकरीच्या निमित्तानं जाळ्यात अडकवायचं. त्यानंतर या मुलींना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातील रिसॉर्टवर पार्ट्या केल्या जायच्या. याचा पर्दाफाश पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून झालाय. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण हे फक्त धर्मांतरण नाही तर देशाच्या सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचं समोर आलंय. एवढंच नाही तर या प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरेही दिसून येतायत. मात्र या प्रकरणात दहशतवाद्यांशी हातमिळवणी केल्याचं उघड झालं तर अशा प्रवृत्ती वेळीच ठेचून काढण्याची गरज आहे.

Nashik News: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात ATS ची एण्ट्री? निदा खानचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन?
Nashik: नाशिक हादरले! २ तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू, कामासाठी शेताकडे गेले; पण परत आलेच नाहीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com