Shreya Maskar
उन्हाळ्यात कुटुंबासोबत आवर्जून थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्या. तुम्हाला येथे निवांत शांतता अनुभवता येईल. तसेच येथील वातावर खूपच आल्हाददायक वाटते.
नाशिक हे गोदावरी नदीकाठी वसलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक शहर आहे. हे शहर 'पंचवटी' मुळे प्रसिद्ध आहे.
कोरोली हिल स्टेशन हे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरजवळ वसलेले आहे. कोरोली हिल स्टेशन लोअर वैतरणा जलाशयाच्या (बॅकवॉटर) सानिध्यात आणि सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आहे.
कोरोली हिल स्टेशन हे हायकिंग आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले हे एक शांत आणि निसर्ग पर्यटन स्थळ आहे. येथे परदेशी पर्यटकही आवर्जून येतात.
हरिहर आणि अंजनेरी किल्ल्यांकडे जाणारे साहसी ट्रेकिंग मार्ग येथे पाहायला मिळतो. तुम्ही येथे वीकेंडला एक ट्रिप नक्की प्लान करा. हे निसर्गप्रेमींसाठी नंदनवन मानले जाते.
इगतपुरी किंवा नाशिक रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही टॅक्सीने कोरोली हिल स्टेशन सहज पोहचू शकता. येथे जवळ राहण्याची, खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
नाशिक येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तशृंगी गड, पंचवटी , पांडवलेणी आणि अंजनेरी टेकड्या ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. तुम्ही येथे नक्की जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.