

नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणात नवी अपडेट
१५० कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश
दोन तरुणींना मलेशियाला पाठवण्याचा संशय
नाशिकमधील टीसीएस या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नवनवीन माहिती समोर येत आहे. आता नाशिकच्या या टीसीएस कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. टीसीएसचे ऑफिस बंद करून १५० कर्मचाऱ्यांना तूर्तास वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीच्या दिल्ली टीमकडून झाडाझडती आणि चौकशी केली जाणार आहे.
नाशिकमध्ये कंपनीच्या दिल्ली टीमकडून धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाची कंपनीकडून अंतर्गत तपासणी सुरू आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देखील कंपनीत धाड टाकण्यात आली आहे. तपासासाठी गेलेल्या टीमला कंपनीत एकही कर्मचारी आढळला नाही. शॉप अॅक्ट आणि कागदपत्रांची तपासणी, संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची टीम देखील १८ एप्रिल रोजी नाशिकच्या कार्यालयाची पाहणी करणार आहे.
लैंगिक शोषण प्रकरणाचं मलेशिया कनेक्शन?
नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिला कर्मचार्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा मलेशिया कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पीडित तरुणींपैकी दोन तरुणींना मलेशियाला पाठवण्याचा डाव असल्याचाही संशय आहे. यामागे मानवी तस्करीच्या शक्यतेचा तपास सुरू आहे.
रिसोर्टवर पार्टी झाल्याची नोंद
नाशिकमधील टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणात विशिष्ट हॉटेलमध्ये पार्टी झाल्याची नोंद आहे. नाशिकच्या त्रंबकेश्वर रोडवरील एका रिसॉर्टमध्ये पार्टी झाल्याची नोंद आहे. SIT कडून या हॉटेलची झाडाझडती घेत रजिस्टर ताब्यात घेण्यात आले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापनाची कसून चौकशी केली जाणार आहे.
या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्या जात होत्या. याच पार्टीत हिंदू मुलींना या प्रकरणातील अटक करण्यात आलेले संशयित आरोपी फूस लावत होते. 2022 ते 2023 दरम्यान या हॉटेलमध्ये पार्टी केली जात होती. पार्टी हॉल बरोबरच हॉटेलचे रुमही बुक असायचे. SIT च्या हातात ही महत्वपूर्ण माहिती लागल्याने आज गुरुवारी संशयित आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता दहशतवाद तपास पथकाकडे गेला आहे. नाशिक शहरात एटीएसचे पथक दाखल झाले आहे. एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. एमएनसी कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांकडून याबाबतची माहिती तक्रारदारांकडून घेतली जाणार आहे. तर स्वतः एटीएस आरोपींची चौकशी करणार आहे. तर सीडीआर रिपोर्टची देखील तपासणी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.