Nandurbar : यात्रेत दुर्दैवी घटना! दर्शनासाठी गेला परत आलाच नाही, ४००० फुटांवरून भाविक दरीत पडला

Nandurbar News : अस्तंबा ऋषी यात्रेदरम्यान मुंदलवड येथील ५० वर्षीय जेरमा वळवी बेपत्ता झाले होते. पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर ४ हजार फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली.
Nandurbar News
Nandurbar News AI Image
Published On: 
Summary
  • नंदुरबारमध्ये दुर्दैवी घटना

  • अस्तंबा ऋषी यात्रेदरम्यान ५० वर्षीय जेरमा वळवी यांचा खोल दरीत कोसळून मृत्यू.

  • ७ नोव्हेंबर रोजी मुलाला कुंडाजवळ थांबवून ते दर्शनासाठी शिखरावर गेले

  • ५ दिवसांनंतर शिखराखालील दुर्गम दरीत त्यांचा मृतदेह आढळला

सागर निकवडे, नंदुरबार

सातपुड्याच्या पर्वतरांगांतील सर्वात उंच आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या अस्तंबा ऋषींच्या यात्रेला यंदा विक्रमी गर्दीचा उच्चांक गाठता आला असला, तरी या भक्तिमय वातावरणाला एका हृदयद्रावक दुर्घटनेने गालबोट लावले आहे. आपल्या मुलाला शिखराच्या पायथ्याशी थांबवून दर्शनासाठी गेलेल्या ५० वर्षीय भाविकाचा तब्बल ४ हजार फूट उंचीवरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. जेरमा वळवी असे या ५० वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून ते अक्राणी तालुक्यातील मुंदलवड गावचे रहिवासी होते.पाच दिवसांच्या सलग शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह हाती लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यंदा अस्तंबा ऋषींच्या यात्रेसाठी तब्बल साडेतीन लाख भाविकांनी हजेरी लावत विक्रमी गर्दी केली होती. या यात्रेसाठी अक्राणी तालुक्यातील मुंदलवड येथील रहिवासी जेरमा वळवी हे आपल्या मुलासोबत मोठ्या श्रद्धेने आले होते. ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कुंडाजवळ आपल्या मुलाला उभे केले आणि मी वर जाऊन दर्शन घेऊन येतो,असे सांगून ते अवघड चढण चढू लागले. मात्र, हीच त्यांची मुलासोबतची अखेरची भेट ठरली. बराच वेळ उलटूनही वडील खाली न परतल्याने मुलाने यात्रेच्या गर्दीत सर्वत्र त्यांचा शोध घेतला. वडील न सापडल्याने हताश होऊन मुलगा एकटाच घरी परतला.

Nandurbar News
Hair Fall : विशीतच केस पांढरे होताहेत? आजच करा 'हे' उपाय; महिनाभरात दिसेल चमत्कार

दोन दिवस उलटूनही पती घरी न परतल्याने जेरमा यांच्या पत्नी कागडीबाई वळवी यांच्या काळजाचा ठोका चुकला. अनर्थ घडल्याच्या भीतीने त्यांनी तातडीने धडगाव पोलीस ठाणे गाठून पती हरवल्याची फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून धडगाव पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. अस्तंबा शिखराचा परिसर अत्यंत दुर्गम, निसरडा आणि खोल दऱ्यांचा आहे.

Nandurbar News
Breaking News : राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेनेच्या २ नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवार गटात करणार प्रवेश

धडगाव पोलीस आणि अस्तंबा गावातील धाडसी स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता सलग पाच दिवस या खोल दऱ्यांमध्ये पिंजून काढत शोध घेतला. अखेर पाचव्या दिवशी ४ हजार फूट उंचीवरील शिखराखालील खोल दरीत जेरमा वळवी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दरीतील दुर्गम भागातच वैद्यकीय पथकामार्फत त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जेरमा वळवी यांच्या निधनाने मुंदलवड गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.