Rahul Narwekar Video: वाद जमीन मोजणीचा का दोन शेतकऱ्यांचा? व्हायरल व्हिडिओवर नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया

Assembly Speaker Rahul Narwekar Reacts On Video: अलिबागमधील जमीन मोजणी वादाशी संबंधित व्हायरल व्हिडिओ संजय राऊत यांनी शेअर केला आहे. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Assembly Speaker Rahul Narwekar Reacts On Video:
Assembly Speaker Rahul Narwekar clarifies his stand after a viral video shared by Sanjay Raut triggered political reactions in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला

  • अलिबागमधील जमीन मोजणीदरम्यान शेतकरी दाम्पत्याचा वाद

  • नार्वेकरांनी दोन शेतकऱ्यांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा

ठाकरे गट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये एक शेतकरी दाम्पत्य नार्वेकरांच्या सहकाऱ्याशी भांडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राहुल नार्वेकरांवर टीका होऊ लागली. राऊतांनी व्हिडिओ पोस्ट केल्याच्या काही मिनिटानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय.

Assembly Speaker Rahul Narwekar Reacts On Video:
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; 'या' दिवशी होणार घोषणा

दोन शेतकऱ्यांचे भांडण होत होते, त्यांचे भांडण सोडवण्याचा आपण प्रयत्न केला होता, अशी प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा व्हिडीओ शेअर केला. त्यावरुन अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.अलिबागमध्ये एका जमीन मालकाच्या मर्जीविरुद्ध जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे शेतकरी दाम्पत्य बाहेरगावी गेले असताना जमिनीची मोजणी केली जात होती. त्याचवेळी ते दाम्पत्य तेथे आले, त्यांनी मोजणीला विरोध करत गोंधळ घातला. झालेल्या प्रकारानंतर राहुल नार्वेकरांना पाय काढता घ्यावा लागला होता.

Assembly Speaker Rahul Narwekar Reacts On Video:
Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार तब्बल ६ हजार रुपये? पण कसं समजून घ्या संपूर्ण गणित

अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील ही घटना आहे. या घटनेवर राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गावी गेलो होतो. त्यावेळी रस्त्यावर दोन शेतकरी आपापासात भांडत होते. मी त्यांना भांडू नका असं सांगत होतो. त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुणीतरी शूट केलं आणि आता ते सोशल मीडियावर टाकलं, असे नार्वेकर म्हणालेत.

नेमकं काय घडलं?

एका व्हायरल व्हिडिओ राहुल नार्वेकर आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. त्यांच्याशी एक दाम्पत्य वाद घालताना दिसत आहे. आपण बाहेरगावी साखरपुड्यासाठी गेलो होतो तर तुम्ही आमच्या घरी कसं काय शिरला? असा प्रश्न हे दाम्पत्य नार्वेकरांच्या सहकाऱ्यांना विचारत आहेत. आम्ही बाहेरगावी गेलो असताना तुम्ही आमच्या जमिनीची मोजणी कशी करता असा सवालही त्यांनी केला. यावेळी नार्वेकर संबंधित दाम्पत्याला शांत बसण्याची सूचना करताना दिसतेय. तुम्ही भांडू नका, असं सांगताना दिसत आहे. मात्र या दाम्पत्याने नार्वेकरांच्या सहकाऱ्याला पकडून त्याला मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com