Maharashtra Assembly Election : मविआने पाटणमध्ये ताकद लावली, देसाई विरुद्ध पाटणकर संघर्ष?

Assembly Election 2024: सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहत आहेत. साताऱ्याच्या पाटण जिल्ह्यात शंभुराज पाटणकरांना ठाकरे गट आणि पवारांनी आव्हान दिलं आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

शिंदे गटाचे हेवी वेट मंत्री शंभुराज देसाईंच्या पाटण मतदारसंघात त्यांना ठाकरे गट आणि पवारांनी आव्हान दिलंय. मात्र पाटणचं समीकरण नेमकं कसं आहे? चला तर मग जाणून घेऊया.

पाटणमध्ये रंगणार पारंपरिक लढत?

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नसतानाच जयंत पाटलांनी सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघासाठी मंत्री शंभुराज देसाईंच्या विरोधात सत्यजित पाटणकरांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. तर सत्यजित पाटणकरांनीही शंभुराज देसाईंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना पराभूत करण्याचा चंगच बांधलाय. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे हर्षद कदम यांनीही पाटणवर दावा सांगितलाय.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीस यांच्यात भेट, काँग्रेसच्या सूत्राचा मोठा दावा, मविआत फाटले?

२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनी राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकरांचा पराभव केला.राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती सरकाच्या काळात मंत्रिपद असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी मतदारसंघात आणला.मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पाटण विधानसभा मतदारसंघाचं समीकरण बदललंय.. तर फुटीनंतर शंभुराज देसाईंनी ठाकरेंना थेटपणे अंगावर घेण्याचं काम केलंय. त्यामुळे शंभुराज देसाईंना घेरण्याची योजना पवार आणि ठाकरेंनी केलीय.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: मनसेच्या 'बिनशर्त' पाठिंब्याची परतफेड होणार, महायुतीकडून राज ठाकरेंना बळ; मध्यरात्री महत्वाची खलबतं!

2019 चं समीकरण कसं होतं?

शंभुराज देसाई, मंत्री, शिंदे गट- 1 लाख 6 हजार 266 मतं

सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस- 92 हजार 91 मतं

14 हजार मतांनी देसाईंचा विजय

लोकसभा निवडणूकीत पाटण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना 2 हजार 900 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे शंभुराज देसाईंची धाकधूक वाढली आहे. मात्र पवारांनी उमेदवार घोषित केला असला तरी ठाकरे गटाने पाटणवर दावा सांगितल्याने बंडखोरी झाल्यास ती देसाईंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.

Maharashtra Politics
Baramati Politics : बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या भिडणार? अजित पवारांकडून प्रचाराला सुरुवात? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com