Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

Shambhuraj Desai News : धनगर आरक्षणासंदर्भात मंत्री शंभुराज देसाईंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळातील प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
Shambhuraj Desai on Dhangar Reservation Saam tv
Published On

मुंबई : राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणवीर आला आहे. धनगर समाजाने आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली आहे. या मागणीसाठी पंढरपूरमध्ये काही कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. धनगर समाजाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई आणि शिष्टमंडळासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर शंभुराज देसाई यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे .

धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत सुरू असलेली बैठक संपली. या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. देसाई म्हणाले, 'धनगर समाजातर्फे उपोषण पंढरपूर येथे सुरु आहे. तिथे आम्ही काल गेलो होतो. त्यानंतर आज तातडीने बैठक लावली. आज सुट्टीचा दिवस असतानाही बैठक लावली. धनगड जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रात मिळवला आहे. ज्या समितीने हे दाखले दिलेत, त्यांना समिक्षा करुन रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीला तसे आदेश दिलेले आहेत'.

धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
Dhangar Community Hunger Strike : धनगर आंदोलक आक्रमक; उपोषणस्थळी विष पिऊन केला आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, VIDEO

'धनगड आणि धनगर एकच आहेत, हा जो अहवाल आहे. त्यावर काही काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी तीन ज्येष्ठ आयएसएस अधिकारी आणि शिष्टमंडळातील ५ लोक असणार आहेत. या समितीकडून मसुदा तयार करण्यात येईल आणि त्यानुसार जीआर काढला जाईल. हा जीआर कोर्टात देखील कसा टिकेल, यासाठी प्रयत्न आहेत. जे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना आम्ही सरकारतर्फे तातडीने आवाहन करत आहोत. की उपोषन मागे घ्या. उपोषण मागे घेण्याचं आश्वासन शिष्टमंडळाने दिलेले आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, 'राज्यात धनगर समाज उपोषणाला बसला आहे. मुख्यमंत्री शंभूराजे देसाई आणि शिस्तमंडळ यांची रविवारी बैठक पार पडली. राज्य सरकारने जीआर काढावा. धनगड समाज राज्यात अस्तित्वात नाही. पाच ते सहा लोक होते, त्यांनी दाखल्यावर रिराईट (rewrite) केलं होतं. आजच्या बैठकीत शंभूराजे देसाई यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत.

धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
Dhangar Reservation: धनगर समाजाला मिळणार आरक्षण? शिंदे सरकारच्या बैठकीत मोठा निर्णय; वाचा सविस्तर माहिती

'आजच्या बैठकीत धनगड समिती गठीत केली होती. ही समितीत पाच राज्यात जाण्यात येणार होती. आतापर्यंत ही समिती तीन राज्यात जाऊन आली आहे. आता दोन राज्यात जाण्याआधी अहवाल देण्यात आला पाहिजे. सकारात्मक बैठक सुरु आहेत. आम्ही सातत्याने चांगली भूमिका घेत आहोत. पण त्यांची भूमिका बघतोय. कुणी राजकीय दबाव आणत असेल तर आम्हीही रास्ता रोको आंदोलन करू. सोमवारी ताकदीने धनगर समाज रत्यावर उतरेल, असे पडळकर पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com