Dhangar Reservation: धनगर समाजाला मिळणार आरक्षण? शिंदे सरकारच्या बैठकीत मोठा निर्णय; वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Government On Dhangar Reservation: धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली, या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
धनगर समाजाला मिळणार आरक्षण? शिंदे सरकारच्या बैठकीत मोठा निर्णय; वाचा सविस्तर माहिती
Dhangar ReservationSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

धनगर आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळात ही बैठक झाली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी समिती नेमणार असल्याची माहिती मंत्री शुभराज देसाई यांनी दिली आहे.

कायद्याच्या चौकटीत बसवून कशा पद्धतीने आरक्षण देता येईल, असं आश्वासन या बैठकीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे. या कामाबाबत तातडीने एक नवीन समिती गठीत करण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनगर समाजाला मिळणार आरक्षण? शिंदे सरकारच्या बैठकीत मोठा निर्णय; वाचा सविस्तर माहिती
Uddhav Thackeray: 'म्हणून मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो', शिवसेना नाव-चिन्हाची सुनावणीवरून उद्धव ठाकरेंचा टोला

धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत सुरू असलेली बैठक संपल्यानंतर मंत्री शुभराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीतील चर्चेची माहिती देताना ते म्हणाले की, ''धनगर समाजातर्फे जे उपोषण पंढरपूर येथे सुरु आहे. तिथे आम्ही काल गेलो होतो. आज तातडीने बैठक लावली. आज सुट्टीचा दिवस असतानाही बैठक लावली.''

ते म्हणाले, ''धनगड जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रात मिळवला आहे. ज्या समितीने हे दाखले दिलेत, त्यांची पडताळणी करुन रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीला तसे आदेश दिलेले आहेत. धनगड आणि धनगर एकच आहेत, हा जो अहवाल आहे, त्यावर काही काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.''

धनगर समाजाला मिळणार आरक्षण? शिंदे सरकारच्या बैठकीत मोठा निर्णय; वाचा सविस्तर माहिती
Lalbaugcha Raja 2024 : लालबाग राजाच्या दरबारी भाविकांना कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक, मंडळाविरोधात तक्रार दाखल

शुभराज देसाई पुढे म्हणाले की, ''धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय झालाय. ज्यात तीन जेष्ठ आयएसएस अधिकारी आणि शिष्टमंडळातील ५ लोक असणार आहेत. या समितीकडून ड्राफ्ट तयार करण्यात येईल आणि त्यानुसार जीआर काढला जाईल. हा जीआर कोर्टात देखील कसा टिकेल, यासाठी प्रयत्न आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com