Lalbaugcha Raja 2024 : लालबाग राजाच्या दरबारी भाविकांना कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक, मंडळाविरोधात तक्रार दाखल

Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ...
लालबाग राजाच्या दरबारी भाविकांना कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक, मंडळाविरोधात तक्रार दाखल
Lalbaugcha Raja 2024Saam tv
Published On

सुरज मसुरकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Complaint Filed Against Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal: लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा सातत्याने दिसून येत आहे. सलग दोन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने लालबागच्या राजाला मोठी गर्दी झालीय. गर्दी वाढल्याने मंडळ कार्यकर्त्याचा मुजोरपणाही अधिक वाढलाय. भाविकांना धक्काबुक्की, मानगुटीला धरून बाजूला फेकणे, असे प्रकार अजूनही सुरू आहेत. साम टीव्हीने हा मुजोरपणा दाखवला होता. ज्यात व्हीआयपींना निवांत दर्शन घेऊ दिलं होतं. त्याचवेळी सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकललं जात असल्याचं आपण बघितलं होतं. अजूनही तीच परिस्थिती दिसून येत आहे.

यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. लालबाग राजाच्या चरणी सामान्य माणसांना दिल्या जाणाऱ्या चुकीच्या वागणुकीसंदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये.

लालबाग राजाच्या दरबारी भाविकांना कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक, मंडळाविरोधात तक्रार दाखल
Uddhav Thackeray: 'म्हणून मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो', शिवसेना नाव-चिन्हाची सुनावणीवरून उद्धव ठाकरेंचा टोला

अँडवोकेट आशिष राय यांच्याकडून ही तक्रार दाकल करण्यात आलीये. सामान्य नागरिकांना व्यवस्थापक किंवा कार्यकर्त्यांकडुन शिवीगाळ करत मारहाण करण्यात येतेय. ही वागणूक अपमाणास्पद असल्याची तक्रार दाखल करण्यात आलीये.

दरम्यान, मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातून लाखो भाविक येत असतात. हे भाविक आठ ते दहा तास रांगेत थांबतात. मात्र या भाविकांना पंडालच्या बाऊन्सर्स आणि सुरक्षारक्षकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो.

लालबाग राजाच्या दरबारी भाविकांना कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक, मंडळाविरोधात तक्रार दाखल
Sanjay Raut: ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर येतील सुखाचे दिवस; राऊतांच्या विधानामुळे मविआत वाढणार टेन्शन?

त्यामुळेच बाप्पा तुझ्या देवळात मुजोरांचा फड असंच म्हणायची वेळ भाविकांवर आलीय. त्यामुळे लालबागचा राजा गणेश मंडळाने बाऊन्सर्सची मुजोरी थांबवायला हवी. कारण ही मुजोरी खुद्द बाप्पालाही आवडणारी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com