Sanjay Raut: ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर येतील सुखाचे दिवस; राऊतांच्या विधानामुळे मविआत वाढणार टेन्शन?

Sanjay Raut In Vaijapur: महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावर परत एकदा दावा केलाय.
Sanjay Raut  In Vaijapur:
Sanjay Raut In Vaijapur:
Published On

राज्याच्या नेत्रतृत्वाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार आहेत. ११ कोटी जनतेचा लाडका नेता उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तेव्हाच सर्वांना सुखाची झोप लागेल, असं विधान संजय राऊत यांनी शिवसंवाद मेळाव्यात केलंय. मात्र राऊतांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा होत आहे. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद होण्याची शक्यता आहे. एका बाजुला निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीचा चेहरा ठरवला जाईल, असा फॉर्म्युला मविआत ठरला होता. या फॉर्म्युल्यानंतरही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय.

वैजापूरमध्ये होत असलेल्या शिवसंवाद मेळावा होत आहे, या बोलतांना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. त्यानंतर मविआतील मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय. शिवसेनेचा भगवा वैजापूरमध्ये कायम आहे. जे ४० गद्दार गेले, त्यातला एक वैजापूरचा गद्दार आहे. हा गद्दरीचा कलंक काढायचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा भगवा झेंडा फडकायवयाचा आहे. या राज्याच्या नेत्रतृत्वाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार आहेत.

११ कोटी जनतेचा लाडका नेता उद्धव ठाकरे हे आहेत. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तेव्हाच सर्वांना सुखाची झोप लागेल. हे राज्यं आम्हाला आमचे वाटत नाही. हे राज्य पुन्हा उभे करायचे आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

Sanjay Raut  In Vaijapur:
Uddhav Thackeray: 'मला मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न...' CM पदाबाबत उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान; नेमके काय म्हणाले?

मुख्यमंत्रीपदावरून मविआत टेन्शन

राज्यात विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने प्रचार सुरू केलाय. प्रचार सुरू असतानाच महाविकास आघाडीत मात्र मुख्यमंत्रीपदावरून वाद होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तर उद्धव ठाकरे यांनाच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा, अशी जाहीर मागणी केली होती.

तर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या मागणीला नकार दिला होता. तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री निवडणुकीच्या निकालानंतर ठरवलं जाईल, असं सांगितलंय. यानंतरही ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदासाठी आग्रह केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com