सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. १५ सप्टेंबर
Uddhav Thackeray Speech Shirdi: शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज जुनी पेन्शन संघटनेचे अधिवेशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, मिलींद नार्वेकर, सुभाष देसाई आमदार शंकरराव गडाख उपस्थित होते. तत्पुर्वी ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक शिर्डी विमानतळावर दाखल होते. यावेळी मुस्लिम शिवसैनिकांकडून उध्दव ठाकरेंना छ्त्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार तोफ डागली. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबतही महत्वाचे विधान केले.
"लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुम्ही कर्मचारीनंतर आधी भाऊ आहात, मी कार्यक्रमाला येण्याअगोदर साईबाबांचे दर्शन घेतले. माझ्याकडे आज काहीच नाही तरी तुम्ही मला इथे बोलावले. माझा पक्ष चोराला, चिन्ह चोरले आणि बापही चोरला. दीवार चित्रपटात डायलॉग आहे, मेरे पास गाडी है ल, बंगला है, सबकूछ है. अमिताभ म्हणतो मेरे पास मां है तस मी म्हणतो मेरे पास इमान है. मागण्यांसाठी उपोषण करण्यापेक्षा यांना सत्तेपासून उपाशी ठेवा, ही सत्ता आपण उलथून टाकणारच, माझं मुख्यमंत्री व्हायचंय स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही पडत नाही," असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
"माझ्यामागे उभी असलेली तुमची ताकद बघितली तर कदाचित हे कॅबिनेटमध्ये जुन्या पेन्शनचा निर्णय घेतील. यांच्यावर विश्वास ठेवणार का?. आम्ही कंत्राटी कामगार, तुम्ही पर्मनंट कामगार.50 खोके वाल्यांना पेन्शन मिळते मग तुम्हाला का नको? लाडकी बहिण योजना आणली, हे फुकटखाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ. योजना राबविणारे कर्मचारी असतात, हे फुकटसुंबे श्रेय घेतात, मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर अन्याय झालाच नसता, हे फक्त लाडक्या मित्रांचे खिसे भरत आहेत," असे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर तोफ डागली.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शिंदे सरकारवर तोफ डागली. जिथे उध्दव ठाकरे उपस्थित असतात तिथले प्रश्न मार्गी लागतात, आम्हाला आमच्या पेन्शनपेक्षा मराठी माणसाच्या पेन्शनची चिंता आहे. नरेंद्र मोदींना अदानीकडून पेन्शन येते, ते अदानीच्या पेन्शनवर जगतात. आपले सरकार येतंय आणि पुढेचे मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित आहेत, तुम्हाला जुनी पेन्शन भेटणारच, असा शब्द संजय राऊत यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.