Sharad Pawar Speech: सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद; निवडणुकीत जागा दाखवू', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार कडाडले!

Sharad Pawar Speech Shetkari Melava Dhule: देशात ऊस उत्पादन राज्यात होते, पण उसाला किंमत मिळत नाही. शेतकरी पिकवतात, जी किंमत मिळाली पाहिजे ती मिळत नाही, हे मोदी सरकारचे काम, अशी टीका शरद पवारांनी केली,
Sharad Pawar Speech: सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद चढला; निवडणुकीत जागा दाखवू', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार कडाडले!
Sharad Pawar Dhule Visit: Saamtv
Published On

भूषण अहिरे, धुळे|ता. १५ सप्टेंबर

Sharad Pawar Speech Dhule: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्याला शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांचे कार्यकर्त्यांकडून जेसीबीने फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमामध्ये खासदार शरद पवार यांच्या हस्ते भजनी मंडळांना टाळ, मृदुंग व ईतर साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित करताना शरद पवार यांनी सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही, असे म्हणत मोदी सरकारवर तोफ डागली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ द्या, राज्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकू, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

काय म्हणाले शरद पवार?

"शिंदखेडा हा सगळा परिसर कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. काळ्या आईशी इमान राखायचं, उत्पादन मिळवायंच, संसार चालवायचा आणि समाजाला देण्याची कामगिरी करायची काम शेतकरी बांधव करतात. अलिकडे राज्यकर्त्यांना शेतीसंबंधी आस्था नाही, शेती हिताची नसलेली धोरणे आणतात. मोदी साहेबांच्या सरकारमध्ये नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निर्यातबंदी केली. देशात ऊस उत्पादन राज्यात होते, पण उसाला किंमत मिळत नाही. शेतकरी पिकवतात, जी किंमत मिळाली पाहिजे ती मिळत नाही," हे मोदी सरकारचे काम, अशी टीका शरद पवारांनी केली,

शेतकरी विरोधी सरकार...

तसेच "दहा वर्ष मी शेती खात्याचा कारभार सांभाळला. हा देश बळी राजाचा देश आहे, हा देश गहू आयात करीत होता तो आमच्या नेतृतवत निर्यातक देश बनवला. शेतकऱ्याच्या डोक्यावरच कर्ज होते, शेतकरी आत्महत्या करीत होते,आणि दिल्लीत कर्ज माफीचा निर्णय घेतला. 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र सध्याचे मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यांना बळीराजाबद्दल आस्था नाही," असा घणाघात शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar Speech: सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद चढला; निवडणुकीत जागा दाखवू', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार कडाडले!
Accident News : देवदर्शनासाठी निघाले, पण वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू

निवडणुकीत जागा दाखवू...

दरम्यान, "शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा गैरवापर सुरु आहे. येथे एक प्रकारची गुंडगिरी सुरु आहे. हेमंत देशमुख सारखा नेता त्यांना तुरुंगात टाकण्याचे कामं केले. हे सत्तेचा गैरवापर आहे. सरकार लोकांच्या सेवेसाठी आहे, सत्तेचा माज काहींच्या डोक्यात आला आहे. सत्तेचा उन्माद आहे, त्यांना जागा दाखविण्याचे कामं या निवडणुकीत करायचे आहे," असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी केला.

Sharad Pawar Speech: सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद चढला; निवडणुकीत जागा दाखवू', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार कडाडले!
Nandurbar Crime News : महाराष्ट्र हादरला! ६ वर्षीय मुलीवर आधी अत्याचार, त्यानंतर हत्या करून केळीच्या बागेत फेकला मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com