''पहिल्यांदा सर न्यायधिषांच्या घरी पंतप्रधान आले. सरन्यायाधीशांची मी आभार मानतो, कारण मोदी घरी येणार म्हणून गणपतीला त्यांनी पुढची तारीख दिली नाही'', असं म्हणत शिवसेना (उद्धव बाबासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. शिवसेना नाव आणि चिन्हाची सुनावणी सतत लांबणीवर जात असल्याने उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे शिवसंवाद मेळाव्यात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावरी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''महाराष्ट्रात सध्या सरकार आपल्या दारी नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी पैसे देऊन माता भगिनींना आणले जात आहे. जेवणाची चंगल आहे.'' ते म्हणाले, ''भाजपला महाराष्ट्रातून भगवा पुसून टाकायचा आहे. मात्र त्यांना ते शक्य होणार नाही.''
ठाकरे म्हणाले, ''लाडकी बहिण म्हणतात आणि भाऊ कोण? फुकटचा पैसा आणि महिलांची मते घेण्यासाठी सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना कोणीही मागणी केली नव्हती, तरीही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. जनता आहे म्हणून तुम्ही खुर्चीत बसलात. हे सरकार दोन तीन महिने राहणार आहे.''
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''अनेक कामे आपण केली. सगळी कामे शिवसेनेची आणि फोटो ते लावतात. हे सगळे लोकांना माहीत आहे. माझे आव्हान आहे की, 1500 रुपये मिळतात घर चालते का, असे बहिणींना विचारा.'' ते म्हणाले, शिवरायांचा अपमान महाराष्ट्रातच नाही जगात कुठेही झाला नाही. शिवरायांचा पुतळा पडला. मंदिर गळते, हे गळते, ते गळते, अशी अवस्था आहे. हे गळती सरकार आहे.''
दरम्यान, याच सभेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, ''या राज्याच्या नेतृत्त्वाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार आहेत. ११ कोटी जनतेचा लाडका नेता उद्धव ठाकरे हे आहेत. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तेव्हाच सर्वांना सुखाची झोप लागेल.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.