Baramati Politics : बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या भिडणार? अजित पवारांकडून प्रचाराला सुरुवात? VIDEO

Ajit pawar News : अजित पवार शिरुरमधून लढणार की बारामतीतून? यासंदर्भातील चर्चांवर अखेर पडदा पडलाय.. अजित पवारांनी मतदारसंघ निश्चित करून प्रचारही सुरु केलाय.. दादांचा हा मतदारसंघ नेमका कोणता आहे? आणि दादांसमोरची आव्हानं काय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या भिडणार? अजित पवारांकडून प्रचाराला सुरुवात?
Baramati PoliticsSaam tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : लोकसभेतील पराभवानंतर कधी बारामती, कधी शिरुर तर कधी कर्जत जामखेड अशा वेगवेगळ्या मतदारसंघातून लढण्याची चर्चा असलेल्या अजित पवारांचा अखेर मतदारसंघ ठरलाय... तर 29 ऑक्टोबरला अजित पवार बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं समोर आलंय.

अजित पवारांनी 1991 सलग 7 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. तर आता आठव्यांदा अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र अजित पवारांची राजकीय कारकीर्द कशी आहे? पाहूयात...

बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या भिडणार? अजित पवारांकडून प्रचाराला सुरुवात?
Eknath Shinde : मोठी बातमी! यादी जाहीर होण्याआधीच CM एकनाथ शिंदेंनी पहिल्या उमेदवाराची केली घोषणा

अजित पवारांची राजकीय वाटचाल?

1991 बारामती मतदारसंघातून खासदार

1991 ते 2019 सलग 7 वेळा बारामतीतून आमदार

1991-92 कृषि राज्यमंत्रिपदाची जबाबदारी

1992 -95 जलसंधारण आणि ऊर्जा राज्यमंत्रिपदावर काम

1999-2004 - पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री

2004-2014- जलसंपदा मंत्री म्हणून काम

2010-2012- उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

2012-2014 दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री

2019 - 80 तासांसाठी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपद

2019-2022- महाविकास आघाडीत चौथ्यांदा उपमुख्यमंत्रिपद

2023-2024 महायुती सरकारमध्ये पाचव्यांदा उपमुख्यमंत्री

बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या भिडणार? अजित पवारांकडून प्रचाराला सुरुवात?
BJP Internal Politics: पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये अंतर्गत कलह, या उमेदवारांच्या नावाला विरोध

अजित पवार बारामतीतून लढणार हे स्पष्ट झालं असलं तरी शरद पवारांच्या पक्षाकडून इच्छूक असलेले आणि दादांचे पुतणे युगेंद्र पवारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे युगेंद्र पवार दादांविरोधात मैदानात उतरून आव्हान देणार की पवार कुटुंबाबाहेरचा उमेदवार रिंगणात उतरवणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com