Maharashtra Politics: मनसेच्या 'बिनशर्त' पाठिंब्याची परतफेड होणार, महायुतीकडून राज ठाकरेंना बळ; मध्यरात्री महत्वाची खलबतं!

Mahayuti- MNS Alliance: लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मनसेच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाला मुंबईमधील जागांवर आघाडी मिळवता आली.
Maharashtra Politics:  मनसेच्या 'बिनशर्त' पाठिंब्याची परतफेड होणार,  महायुतीकडून राज ठाकरेंना बळ; मध्यरात्री महत्वाची खलबतं!
Mahayuti- MNS Alliance:Saamtv
Published On

Maharashtra Assembly Election News: विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडी तसेच महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महायुतीचा मनसेला बिनशर्त पाठिंबा!

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मनसेच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाला मुंबईमधील जागांवर आघाडी मिळवता आली. लोकसभा निवडणुकांमधील या बिनशर्त पाठिंब्याची आता महायुती परतफेड करणार असल्याची महत्वाची अपडेट समोर आली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबईत महत्वाची बैठक

महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री तब्बल दोन तास या सर्व नेत्यांमध्ये बैठक झाली. शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून महायुती व मनसेच्या पुढील निर्णयाकडे लक्ष आता लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics:  मनसेच्या 'बिनशर्त' पाठिंब्याची परतफेड होणार,  महायुतीकडून राज ठाकरेंना बळ; मध्यरात्री महत्वाची खलबतं!
Maharashtra Politics : विधानसभेला मनोज जरांगेंनी डाव टाकला, लढायचं अन् पाडायचं; सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

दरम्यान, भारतीय जनता पक्षानंतर आता शिवसेनेकडून पहिली यादी आजच जाहीर केली जाणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ६० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर आज ६० उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ६० आमदारांच्या नावाच्या यादीत शिंदेसोबत आलेल्या ४० विद्यमान आमदारांची नावे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या २४ ॲाक्टोंबर रोजी ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधान सभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. या बैठकिला विद्यमान आमदार, खासदार आणि इच्छुक उमेदवारांची वर्षावर बैठक होत आहे. वर्षावर सध्या कृपाल तुमाने, हेमंत पाटील, माजी खासदार हेमत गोडसे, अजय बोरस्ते, प्रकाश पाटील, वामन म्हात्रे, शिशिर शिंदे, मिलिंद देवरा, किरण पासकर, भाऊ साहेब चौधरी, रविंद्र फाटक, खा धर्येशील माने, शितल म्हात्रे, विनायक राणे, मंत्री प्रतापराव जाधव, संजय निरूपम, निलम गोर्हे, नरेंद्र बोडेकर आदी नेते उपस्थित आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com