Assembly Election: सांगलीसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? विधानसभेसाठी एकजूट की पुन्हा फूट?

Assembly Election Mahavikas Aaghadi : सांगलीत लोकसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली होती. ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने आले होते. ज्या विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे हे सगळं झालं होते. ते खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाकरेंचा राग मावळला का? सांगली विधानसभेचा फॉर्म्युला ठरला का ? याचा वेध घेऊया या रिपोर्टमधून
Assembly Election: सांगलीसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? विधानसभेसाठी एकजूट की पुन्हा फूट?
Assembly Election Mahavikas Aaghadi Quint
Published On

लोकसभेत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे कदम-पाटील आणि ठाकरे विधानसभेसाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सांगलीसाठी मविआचा फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा रंगलीय. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटलांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्यात. सांगलीतील जागावाटपाच्यादृष्टीनं ही भेट झाल्याची चर्चा आहे. विशेष गोष्ट म्हणजे विशाल पाटलांच्या बंडखोरीनं संतापलेल्या ठाकरेंचा आता सूर मवाळ झालाय.

दिल्लीतील या बैठकीतून सांगलीसाठी मविआचा फार्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागंलीत विधानसभेच्या एकूण आठ जागा आहेत. कोणत्या जागा कोणत्या पक्षाला जाण्याची शक्यता आहे आणि कोण संभाव्य उमेदवार आहेत ते पाहूयात.

काँग्रेस - 3 जागा

विश्वजित कदम - पलूस कडेगाव

विक्रम सावंत - जत

पृथ्वीराज पाटील - सांगली

राष्ट्रावादी काँग्रेस (SP) - 3 जागा

इस्लामपूर - जयंत पाटील

रोहित पाटील - तासगाव

मानसिंग नाईक - शिराळा

ठाकरे गट - 2 जागा

खानापूर - चंद्रहार पाटील

मिरज - सिद्धार्थ जाधव

ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीवरुन कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलंय. सांगलीतील लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल होते. हा पराभव ठाकरेंच्या जिव्हारी लागला होता. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. सांगलीत मविआची ही एकजूट आता किती फायद्याची ठरेल ते विधानसभा निकालाताच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com