Ranjitsinh Mohite Patil: पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा, 'तुतारी' हाती घेणार

Ranjitsinh Mohite Patil Resign From BJP: भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.
Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा, तुतारी हाती घेणार
Ranjitsinh Mohite Patil Resign From BJP:Saamtv
Published On

सागर आव्हाड, पुणे

Ranjitsinh Mohite Patil Resign: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. आज रात्री ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

शरद पवारांचा भाजपला हादरा

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली असून महायुतीमधील अनेक दिग्गज नेते तुतारी हाती घेण्यास इच्छुक आहेत. गेल्या महिनाभरापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. अशातच आता शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का दिला आहे.

मोहिते पाटलांचा राजीनामा!

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार, विजयसिंह मोहिते पाटील यांची सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठवल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. आज रात्रीच रणजितसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. विजयसिंह मोहिते पाटीलही आज सांसदीय बैठकीला हजेरी लावणार असून या बैठकीनंतर हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा, तुतारी हाती घेणार
Pimpri-Chinchwad Crime: पती हाय का हैवान! इंजिनिअर पत्नीवर मित्रांना अत्याचार करायला सांगितलं, व्हिडीओही काढला, पतीसह चौघांविरोधात गुन्हा

दुसरीकडे माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र शिंगणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात प्रवेश पार पडणार आहे. नुकतीच राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणा केली होती. गायत्री शिंगणे यांनी याबाबत शरद पवार यांची भेट घेऊन राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती.

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा, तुतारी हाती घेणार
Maharashtra Politics : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत; पडद्यामागे काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com