Maharashtra Politics : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत; पडद्यामागे काय घडतंय?

Eknath Shinde Guwahati News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा गुवाहाटीला जाणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
Eknath Shinde Guwahati News
Eknath Shinde Guwahati NewsSaam TV
Published On

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारी पुन्हा गुवाहाटीला जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे हे कामाख्या देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचं नारळ फोडणार, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं होतं. तेव्हाही त्यांनी थेट गुवाहाटी गाठली होती.

Eknath Shinde Guwahati News
Maharashtra Politics : महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत जागावाटपाबाबत नेमकी काय चर्चा झाली? इनसाइड स्टोरी वाचा

त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गुवाहाटीतून गोवा मार्गे थेट मुंबईत आल्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतरही शिंदे पुन्हा गुवाहाटीला गेले होते. यावरुन विरोधकांनी '५० खोके एकदम ओके' असं म्हणत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

आता विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गुवाहाटील जाऊन शिंदे कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. इतकंच नाही तर, ते प्रचाराचं नारळ देखील फोडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने केलेला उठाव सक्सेस झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या जागावाटपाबाबत तब्बल अडीज तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवला आहे. त्याचबरोबर तिन्ही पक्षाला फॉर्म्युला देखील सांगितला आहे.

भाजप जवळपास १५० ते १५५ जागा लढवणार आहे. तर शिंदे गटाला ८० ते ८५ जागा मिळणार आहेत. अजित पवार गटाला ४५ ते ५० जागा सोडण्यात येईल, असा फॉर्म्युला अमित शहा यांनी दिला आहे. मात्र, कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाने उमेदवार द्यावा हा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून घ्यायला हवा, अशा सूचना देखील अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे.

Eknath Shinde Guwahati News
Assembly Election 2024: कोकणात ठाकरे- शिंदेंच्या शिवसेनेचाच दबदबा! काँग्रेस- भाजपचे एक पाऊल मागे; जागा वाटपाचे गणित काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com