Maharashtra Politics : महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत जागावाटपाबाबत नेमकी काय चर्चा झाली? इनसाइड स्टोरी वाचा

Mahayuti seat sharing formula : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती होती.
महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत जागावाटपाबाबत नेमकी काय चर्चा झाली? इनसाइड स्टोरी वाचा
Ajit Pawar Demand To Amit ShahSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

नवी दिल्ली : लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन जोरदार खलबंत सुरु आहे. काल शुक्रवारी (ता. १८) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती होती.

महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत जागावाटपाबाबत नेमकी काय चर्चा झाली? इनसाइड स्टोरी वाचा
Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

तब्बल अडीच तास सुरु असलेल्या या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवला आहे. त्याचबरोबर तिन्ही पक्षाला फॉर्म्युला देखील सांगितला आहे. भाजप जवळपास १५० ते १५५ जागा लढवणार आहे. तर शिंदे गटाला ८० ते ८५ जागा मिळणार आहेत.

अजित पवार गटाला ४५ ते ५० जागा सोडण्यात येईल, असा फॉर्म्युला अमित शहा यांनी दिला आहे. मात्र, कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाने उमेदवार द्यावा हा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून घ्यायला हवा, अशा सूचना देखील अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिल्या आहेत.

तसेच जागावाटपावरुन जास्त खल न ठेवता निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागावे. प्रचाराचे मुद्दे तसेच जाहीरनामा आणि प्रचारसभांवर चर्चा करावी, असे आदेशही अमित शहा यांनी तिन्ही नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे अमित शहा यांचा आदेश मानू महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला १५५-८०-५० असा राहणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीचा देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आगामी विधानसभेत मविआ १००-८०-८० फॉर्म्युल्यावर लढण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेस १०० जागा, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी ८० जागा येणार आहे. उर्वरीत २८ जागा या मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत जागावाटपाबाबत नेमकी काय चर्चा झाली? इनसाइड स्टोरी वाचा
Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com