Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

CM eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडक्यात बचावले आहे. खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.
CM शिंदे थोडक्यात बचावले;  हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?
CM Eknath Shinde Saam Tv
Published On

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले. आज शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. त्यांचं हेलिकॉप्टर दरे गावातून पुण्याला जात होते. त्यावेळी ही घटना घडली. इमर्जन्सी लँडिंगनंतर ते कारने पुण्याला गेले.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर होते. साताऱ्यावरून मुख्यमंत्र्यांना दिल्लीला रवाना व्हायचं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याला जाणार होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील दरे गावातून हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने स्वीय सहाय्यक प्रभाकरजी काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे यांच्यासोबत निघाले होते. पुण्याला निघाल्यानंतर अचानक वातावरण ढगाळ झालं आणि मुसळधार पाऊस सुरु झाला.

CM शिंदे थोडक्यात बचावले;  हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?
Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फुटावर हेलिकॉप्टर खाली आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर आजूबाजू्च्या कोणत्याही शेतामध्ये लँड करावे का? याबाबत पायलटने विचारणा केली. मात्र, आजाबाजूची कोणतीही जमीन सोयीची नव्हती. त्यामुले मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले.

CM शिंदे थोडक्यात बचावले;  हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

हेलिकॉप्टरने ज्या ठिकाणाहून टेकऑफ घेतला. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. या मोठ्या घटनेतून मुख्यमंत्री शिंदे थोडक्यात बचावले. मुख्यमंत्री शिंदे सर्व सहकाऱ्यांसोबत पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने निघाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com