Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: अँजिओप्लास्टी पार पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे माध्यमांसमोर आले आहेत.
Uddhav Thackeray in front for the first time after angioplasty
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अँजिओप्लास्टी पार पडली होती. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होत असताना दुरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे मैदनात उतरले आहेत. अँजिओप्लास्टी पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.

आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे आणि सिंधुदुर्ग भाजपचे स्थानिक नेते राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांना पाहून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचं चित्र होतं.

Uddhav Thackeray in front for the first time after angioplasty
Thackeray Group Vs Congress: मविआच्या जागावाटपाचा वाद विकोपाला, पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही; ठाकरे गटाची भूमिका: सूत्र

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यावेळी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''दसऱ्यानंतर पहिल्यांदा समोर आलो. मधल्याकळत हॉस्पिटल वारी केली. आनंदाची गोष्ट अशगी आहे की, त्यानंतर डॉक्टरवर म्हणाले होते आराम करा, मात्र आता आराम आता कार्याचा तरी किती? आधी यांना (महायुती सरकार ) घालवायचं आहे, त्याशिवाय आता आराम नाही.''

ठाकरे म्हणाले, ''आज कामाला सुरुवात केली आहे. मुहूर्त चांगला लागला आहे. आबांसारखा मजबूत गडी शिवसेनेत सामील होत आहे, शिवसेना मजबूत होत आहे. मशाल कशी पेटवायची आणि कोणाला चटके द्यायचे, हे ठरवायचे तुम्हाला,'' ते असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकाच हशा पिकला आणि कार्यकर्ते उत्साही झाले.

Uddhav Thackeray in front for the first time after angioplasty
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा महायुती, नारायण राणेंना मोठा धक्का; राज्यातील २ दिग्गज नेत्यांनी हाती धरली मशाल, कशी असेल लढाई?

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ''आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पेटवायची. बरेच खोकेवाले लोक आहेत. विजय नक्की आहे.. उमेदवारी अजून कोणाची जाहीर केली नाही, फक्त दीपक आबा यांच्या हाती मशाल दिली आहे. संगोल्याचा आमदार गद्दार झाला, पण तुम्ही माझ्यासोबत आहेत आणि शब्दाला जागाल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com