

भरत मोहोळकर -
Ashok Kharat involvement in NAFED onion procurement scam : नाफेडच्या कांदा खरेदीतही खरातने घोटाळा केल्याचं समोर आलंय.. मात्र खरातनं हा घोटाळा कसा केला? आणि शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर खरातनं कसा डल्ला मारलाय.?.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
महिलांचं शोषण करणारा वासनांध अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही.. 8 ऑगस्ट 2025 ला साम टीव्हीनं नाफेडच्या कांदा खरेदीत तब्बल 5 हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा चव्हाट्यावर आणला होता..त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं.. मात्र आता याच नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदी घोटाळ्यात भोंदू खरातची एण्ट्री झालीय...
सिन्नरच्या नांदूर शिंगोटेच्या पत्त्यावर व्यंकटेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी आहे.. या कंपनीवर अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात संचालक आहेत.. 2024 मध्ये खरातच्या व्यंकटेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनीला नाफेडच्या कांदा खरेदीचं कंत्राट मिळालं. याच कंपनीचा कांदा खरेदी घोटाळ्यात सहभाग असल्याचं समोर आलंय..
खरंतर नाफेडच्या कांदा खरेदीसाठी अडीचशेपेक्षा जास्त फार्मर प्रोड्यूसर कंपन्या उत्सुक होत्या.. मात्र त्यानंतरही भोंदू खरातच्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं.. खरातचं फक्त एकाच कंपनीत भांडवल नाही तर 17-18 कंपन्यात खरातची गुंतवणूक आहे... त्यामुळे भोंदू खरात शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावरच डल्ला मारत असल्याचं समोर आलंय.. त्यामुळे ईशान्येश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी असो वा व्यंकटेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी...या कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासोबतच ज्या अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांनी इतर कंपन्यांना डावलून खरातच्या कंपनीला कंत्राट दिलं.. त्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी...
अभिजीत सोनवणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.