

अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
विजय वडेट्टीवार यांनी केला खळबळजनक दावा
मंत्रालयातील IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बायका खरातकडे जायच्या
प्रकरणात १००० व्हिडिओ असल्याचा आरोप
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावं समोर येत आहेत. अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि अनेक बड्या अधिकाऱ्यांचे अशोक खरातसोबत कनेक्शन उघड झाले आहेत. या प्रकरणावरून विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. रोज या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी या प्रकरणात एक खळबळजनक खुलासा केला आहे. मंत्रालयातील अनेक IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बायका अशोक खरातकडे जात होत्या, असे त्यांनी सांगितले. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे हे आयएएस आणि आयपीएस अधिकारी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.
विजय वडेट्टीवार यांची अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी सांगितले की, अशोक खरातजवळ मंत्रालयातील मोठमोठे आयएएस आणि आयपीएस अधिकारी आपल्या बायकांना पाठवायचे. मोठे उच्च शिक्षित अधिकारी बाहेर बसून आपल्या बायकांना अशोक खरातच्या केबिनमध्ये आत पाठवायचे. भोंदूगिरीला पाठीमाग आल्याचे काम अधिकार्यांनीच केले. त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.'
अशोक खरातची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 'अशोक खरातसोबत जवळपास १००० व्हिडिओ आहेत या सर्व प्रकरणाचे खुलासे झाले पाहिजे. अशोक खरात आता तर मुली पण पूरवत होता. खरातवर ज्यावेळी गुन्हा दाखल होत होता त्यावेळी २ आयएएस आणि एक आयपीएस अधिकारी एका हॉटेलमध्ये खरात सोबत बसले होते. भोंदूने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या फॅमिली शेअर करायला लावल्याचे नवीन प्रकरण समोर येत आहे. हे अत्यंत घाणेरडे स्वरूप असून यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे.'
तसंच, 'अशोक खरातच्या पेनड्राईव्हमध्ये १००० पेक्षा जास्त व्हिडीओ आहेत. काळा पैसे पांढरा करून देणारे चेहरे या बाबाच्या सोबत दिसत आहेत. हा भोंदूबाबा मंत्र्यांचा काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा करत असावा.', असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता एसआयटी चौकशी पुरेशी नाही. तर या प्रकरणाची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.