राजकीय नेत्यांचे भविष्य पाहणारा बलात्कारी कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या गुप्त प्लॅनची जोरदार चर्चा रंगली आहे. कॅप्टन अशोक थोरात याच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी खरात याला अटक करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला. खरातच्या कार्यालय तथा त्याने बांधलेल्या मंदिरामध्ये नेहमीच राजकीय वरात असल्याने दबाव येऊ शकतो किंवा खरातला याबाबत थोडी जरी चुणूक लागली असती तर तो पोबारा झाला असता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक पकडण्यासाठी अतिशय गुप्तपणे प्लॅन केल्याची चर्चा आता रंगत आहे. नाशिकच्या गोविंदनगर भागात खरातचा आलिशान बंगला आहे.
मध्यरात्री या बंगल्यात चोर शिरल्याचा बनाव करत गुंडाविरोधी पथक खरातच्या बंगल्यात घुसले. त्यावेळी खरात हा बेडरूममध्येच होता. पथकाने त्याला बोलत हॉलमध्ये आणले आणि तुमच्या घरात चोर घुसला आहे असे सांगून संपूर्ण बंगल्याची झाडाझडती घेतली, आणि त्याला पुन्हा हॉलमध्ये आणून त्याला थेट अटक वॉरंट दाखवत त्याच्या मुसक्या आवळल्या. अचानक झालेल्या या कृतीमुळे खरातला हालचाल करण्यास कोणताच वाव मिळाला नाही. चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत त्याला घरातूनच बेड्या ठोकल्या, ही कारवाई अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे समोर येत आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अशोक खरातला अटक करण्यासाठी वेगळाच डाव आखला होता.
आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचे सांगत पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री अनेक बड्या नेत्यांचे नाशिक पोलिसांना फोन आले. मात्र पोलिसांनी या राजकीय वरातीला थारा न देता खरातला जेरबंद केले.
दरम्यान, घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या. या अनपेक्षित हालचालीमुळे आरोपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.